

Amravati Teachers Constituency : अमरावती शिक्षण मतदारसंघात भाजपला बंडखोरांची चांगलीच डोकेदुखी वाढवली आहे. बंडखोर चंद्रशेखर भोयर यांनी, महायुतीमधील मित्रपक्ष एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांना डिवचले आहे.
तर भाजपमधील बंडखोरांचे बंड शमवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यांच्याकडून प्रतिसाद येत नसल्याचे आमदार प्रताप अडसड यांनी सांगितले. बंडखोरांना रोखण्यासाठी पक्षातून सहा वर्षांसाठी निंबलनाची कारवाई करण्यात आली. तरी बंडखोर थांबायला तयार नाही, आता भाजप काय पाऊल उचलणार याकडे लक्ष लागले आहे.
अमरावती शिक्षण मतदारसंघात भाजपला (BJP) बंडखोरांचा सामना करावा लागत आहे. चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदे आणि सुमित पवार यानी भाजपलाच आव्हान दिलं आहे. ही जागा एकनाथ शिंदे शिवसेनेला सुटली आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मित्रपक्षाला मदत करून युती धर्म पाळावा असे आवाहन केले आहे. भाजपचे बंडखोर मात्र ऐकायला तयार नाहीत. यातच एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवाराच्या प्रचारासाठी अमरावतीत पोहोचलेले शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांना भाजपचे बंडखोर चंद्रशेखर भोयर यांनी डिवचले आहे.
अमरावती शिक्षक मतदार संघात महायुतीच्यावतीने एकनाथ शिंदे शिवसेनेचे (Shivsena) उमेदवाराच्या प्रचारासाठी मेळावा घेतला. याचवेळी महायुतीतील भाजपच्या बंडखोर उमेदवारांच्या समजुतीसाठी एक शिष्टमंडळ भेटून त्यांची मनधरणी करण्याची तयारी सुरू आहे. महायुतीतील या हालचालींकडे, भाजपच्या बंडखोरांचे बंड शमवण्यात यश येते का याकडे सर्वांचे लक्ष लागला आहे.
भाजपचे बंडखोर चंद्रशेखर भोयर यांनी यावर प्रतिक्रिया देता, एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी अमरावतीत आपला वेळ वाया घालू नये, असा टोला लगावला आहे. विद्यमान आमदार यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. सहा वर्षात त्यांनी कोणतेही काम करू शकले नाही. निवडून सुद्धा येणार नाहीत. त्यामुळे उदय सामंत यांनी अमरावतीत जास्त वेळ घालवू नये, आपला उमेदवार निष्क्रिय आहे, असेही चंद्रशेखर भोयर यांनी म्हटले आहे.
तसेच पुण्यामध्ये अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना एकनाथ शिंदे शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. पुण्यात एकनाथ शिंदे शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेप्रमाणे भाजपने मला अमरावतीत पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा चंद्रशेखर भोयर यांनी व्यक्त केली.
दरम्यान, भाजपच्या बंडखोरांचे बंड शमविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर आमदार प्रताप अडसड यांनी प्रतिक्रिया दिली. बंडखोर चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदे आणि सुमित पवार यांना भाजपमधून निष्कासित केल्यानंतर सुद्धा त्यांच्याशी बोलणे सुरू आहे. निष्कासित केल्याने पक्षाला आता त्यांच्याशी चर्चा करण्याचा अधिकार उरत नाही. परंतु त्यांची माघार घेण्याची तयारी नाही. निवडणूक महायुतीच्या बाजूने झाली पाहिजे. आपला उमेदवार विजय झाला पाहिजे, त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असेही आमदार अडसड यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.