

Amravati BJP Politics : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप खासदार अनिल बोंडे अन् त्यांची पत्नी डाॅ. वसुधा बोंडे या दाम्पत्याची भूमिका चर्चेत आली आहे.
भाजप खासदार अनिल बोंडे हे महायुतीतील एकनाथ शिंदे शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारात, तर खासदार बोंडेंची पत्नी डाॅ. वसुधा भाजपमधून बंडखोरी करत उमेदवारी करत असलेल्या त्यांची भगिनी संगीता शिंदे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. राजकारणात बहीण-भाऊ आणि नंदन-भावजय यांची मैत्री चर्चेत आली आहे.
भाजपमध्ये बंडखोरी करत, संगीता शिंदे उमेदवारी करत आहे. संगीता शिंदे या भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी आहेत. पण संगीता शिंदे यांच्या प्रचारात खासदार बोंडे यांची पत्नी डाॅ. वसुधा मैदानात उतरल्या आहे. अमरावतीत बहीण-भाऊ, नणंद-भावजयीचे राजकारण चर्चेत आले आहे. अमरावतीची जागा ही महायुतीमधील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेकडे गेली आहे.
यामुळे महायुतीत बंडखोरीची ठिणगी पडली आहे. भाजपचे (BJP) पदाधिकारी चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदे आणि सुमित पवार यांनी बंडखोरी केली. याची गंभीर दखल घेत भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार प्रताप अडसड यांनी तिघांनाही तातडीने सहा वर्षांसाठी पक्षातून निष्कासित केले आहे. महायुतीमधील बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून शेवटपर्यंत प्रयत्न सुरू होते.
भगिनी संगीत शिंदे यांच्या बंडखोरीवर, त्यांचे बंधू भाजप खासदार अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया देताना, ती ऐकत नाही. ती स्वतंत्र विचाराची आहे. विवाह देखील त्यांनी स्वतंत्र केलेला आहे. विचारले देखील नाही. मी भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. महायुतीचे पालन करेल. महायुतीचा उमेदवाराच्या विजयासाठी मी जीवाची पराकाष्ठा करेल, असे म्हटले.
भावाची पत्नी डाॅ. वसुधा आपल्या प्रचारात सहभागी झाल्यावरून, संगीता शिंदे यांनी, भावजय म्हटली की त्रास देणारी, पण मी याबाबत लकी आहे, त्यांनी मला भरपूर प्रेम दिले. माझ्या उमेदवारीमुळे माझ्या भावाभोवती अडचणी आल्या आहेत. पण डॉ. वसुधा बोंडे या खंबीरपणे माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या. तू लढ, घाबरू नको असे म्हणत त्यांनी सपोर्ट केला आहे, असे म्हटले.
अमरावतीमधील निवडणुकीत भाजप खासदार बोंडे यांच्या कुटुंबांचे राजकारण चर्चेत आले असून, एकाच कुटुंबात प्रचाराच्या दोन वेगवेगळ्या भूमिका दिसत असल्याने महायुतीवर काय परिणाम होणार याकडे लक्ष लागले आहे. या कुटुंबामुळे आगामी काळात राजकीय समीकरणांना नवी वळण येणार असल्याचे चिन्ह आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.