Katol vote scam : अनिल देशमुखांनी फोडला बॉम्ब; काटोलमध्ये 35 हजार मतांची चोरी, आमदाराच्या भावांची नावे दुबार

Votes Stolen Katol News : काँग्रेसचे नेते राहुल गांधी एकापाठोपाठ मतदार याद्यांमधील घोळ बाहेर काढत असताना राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघात तब्बल 35 हजार 535 मतांची चोरी झाल्याचा बॉम्ब फोडला.
Anil deshmukh
Anil deshmukhsarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : सध्या मतचोरीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी एकापाठोपाठ मतदार याद्यांमधील घोळ बाहेर काढत असताना राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघात तब्बल 35 हजार 535 मतांची चोरी झाल्याचा बॉम्ब फोडला. काटोलचे भाजपचे आमदार चरण ठाकूर यांचे भाऊ दिलीप व मुन्ना ठाकूर यांची नावे दोन ठिकाणी तर मध्यप्रदेश येथील लांगामधील सरपंच वनिता पराडकर व त्यांचे पती उपसरपंच गणपती पराडकर हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांची नावे काटोलच्या मतदार यादीत असल्याचा दावाही देशमुख यांनी केला.

भाजप सरकारवर सर्वच जण नाराज आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी भाजपला त्यांची जागा दाखवली होती. त्यानंतर विधानसभेत अचानक बदल झाला. विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदार यादीमध्ये घोळ केल्याचा दावा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला.

देशमुख म्हणाले, 'अनेक ठिकाणी मतदार याद्यांमधील घोळ समोर आल्यानंतर काटोल-नरखेड विधानसभेतील मतदार याद्यांची तपासणी करण्यासाठी 13 टीम तयार करण्यात आल्या होत्या. या चमूने तीन महिने मतदार यादीची तपासणी केली. त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

Anil deshmukh
BJP Politics : एकनाथ शिंदेंच्या कट्टर विरोधाकडे भाजपने दिली निवडणुकीची सूत्र; ठाणे जिल्ह्यातील 6 पालिकांमध्ये थेट सामना होणार!

विधानसभा 2019 ते लोकसभा 2024 निवडणुकीदरम्यान मतदारांची झालेली वाढ 1,952 इतकी होती. परंतु लोकसभा 2024 ते विधानसभा 2024 या पाच महिन्यांच्या कालावधीत 8 हजार 400 मते वाढली. इतकेच नाही तर, लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांनी मतदान केले होते, त्यांचे व कुटुंबीयांचे नावे विधानसभा 2024 च्या निवडणुकीच्या वेळी मतदार यादीमध्ये नव्हते. मुलाचे आणि वडिलांचे नाव वेगवेगळे असणे, घर क्रमांक झिरो असणे, एकाच व्यक्तीचे नाव शहरातसुद्धा आणि ग्रामीणमध्येसुद्धा असल्याचे आढळले. असे दुबार मतदार हे प्रामुख्याने भाजपचेच कार्यकर्ते आहेत.

Anil deshmukh
Shivsena UBT News : 'दगाबाज' सरकारला उद्धव ठाकरे जाब विचारणार! महिनाभरात दुसरा मराठवाडा दौरा करणार

काटोलचे आमदार चरण ठाकूर यांचे भाऊ दिलीप व मुन्ना ठाकूर यांचेही दोन ठिकाणी नाव आहे. कोंढाळीचे भाजपाचे (BJP) पदाधिकारी योगेश शेषराव चाफले यांनी जेथुन सोयीचे आरक्षण येईल तेथून निवडणूक लढविण्यासाठी आपले नाव हे कोंढाळी नगर पंचायतीमध्ये सुध्दा टाकले. दुधाळा जिल्हा परिषदेसाठी काटेपांजरा या गावातही त्यांचे नाव असल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे.

Anil deshmukh
BJP leaders join Congress : थोरातांची 'रनमशिन' सुरू; कोण म्हणतं इनकमिंग होत नाही, फक्त आम्ही गाजावाजा करत नाही!

कोंढाळी येथील नगर पंचायतचे नगराध्यक्ष पदाचे आमच्या पक्षाचे उमेदवार संजय राऊत यांनी कोणताही अर्ज न करता त्यांचे वानाडोंगरी नगर पंचायतमध्ये स्थलांतरीत करण्यात आले. या प्रकरणात नुकताच एक अहवाल जिल्हाधिकारी यांनी दिला असून त्यांनी त्यात स्पष्टपणे म्हटले आहे की, संजय राऊत यांनी नाव स्थलांतरासाठी कोणताही अर्ज केला नव्हता. तसेच हेतुपुरसपर त्यांचे नाव स्थालांतरीत करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी तहसीलदार हिंगणा यांनी हिंगणा पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे.

Anil deshmukh
Devendra Fadnavis : महायुतीत तणावाच्या चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत..!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com