Chandrapur News: भाजप नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल! चंद्रपुरात खळबळ

Gadchandur Molestation Case: चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर नगरपरिषदेचे भाजप नगरसेवक सूरज पांडे यांच्याविरुद्ध विवाहित महिलेच्या तक्रारीवरून विनयभंगासह संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा तपास सुरू आहे.
Gadchandur Molestation Case News
Gadchandur Molestation Case Newssarkarnama
Published on
Updated on

BJP Leader News: चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर नगरपरिषदेचे भाजपचे नगरसेवक सूरज पांडे यांच्याविरुद्ध एका विवाहित महिलेच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

६ जुलै रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पीडित महिला आपल्या मुलीसोबत घरी असताना ही घटना घडली. तक्रारीनुसार, सूरज पांडे यांनी महिलेच्या घरात प्रवेश करून तिच्या इच्छेविरुद्ध वर्तन करत विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आरोपीकडून यापूर्वीही पीडितीला वारंवार त्रास दिला जात होता. "तुला आणि तुझ्या पतीला जीव मारून टाकीन. खोट्या गुन्ह्यात अडकवून आयुष्यभराची शिक्षा देईन, अशी धमकी देत मानसिक छळ केल्याचाही आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.

Gadchandur Molestation Case News
Sharad Pawar News: शरद पवारांच्या उपस्थितीत मोठा निर्णय! शिवनगर संस्थेत पार्थ-युगेंद्र पवारांची नियुक्ती; सुनेत्रा पवार उपाध्यक्षपदी

या प्रकाराला कंटाळून संबंधित महिलेने गडहिंग्लज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी नगरसेवक सूरज पांडे यांच्याविरुद्ध विनयभंगासह संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे.

लोकप्रतिनिधीविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने परिसरातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून प्रकरणाचा तपास सुरू केला असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Gadchandur Molestation Case News
Sharad Pawar NCP: शरद पवार पक्षाची पिंपरी-चिंचवड कार्यकारिणी बरखास्त! अमोल कोल्हेंच्या प्लॅननुसार नव्या चेहऱ्यांना संधी
  • भाजप नगरसेवक सूरज पांडे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल.

  • विवाहित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई.

  • घरात घुसून विनयभंग व धमकी दिल्याचा आरोप.

  • प्रकरणाचा तपास सुरू; राजकीय वर्तुळात खळबळ.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com