BJP Vs Shivsena : भाजपने मैत्रीच्या नावाखाली आमचे उमेदवार पाडले, ते आमच्या लक्षात आलं नाही; शिवसेना नेत्याची खंत

Bhaskar Jadhav statement : संजय शिरसाट यांनी महायुती आम्हीच मोठे भाऊ असे जे विधान केले आहे. ते भाजपला सहन होत नाही. कारण, भाजपला स्वतःला मोठे व्हायचं असतं.
Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
Devendra Fadnavis-Uddhav ThackeraySarkarnama

Nagpur, 16 June : शिवसेना 1990 पासून मुंबईच्या बाहेर निवडणुका लढवत आहे. त्यावेळी सर्वात जास्त आमदार हे शिवसेनेचे निवडून आले होते, भाजपचे नव्हते. पण, भाजपने मैत्रीच्या नावाखाली हळूहळू आमचे उमेदवार पडण्याचे काम केले. तो भाजपचा हातखंडा आहे, हे आमच्या लक्षात आलं नाही, अशी सल शिवसेनेचे आमदार तथा पूर्व विदर्भाचे संपर्क नेते भास्कर जाधव यांनी बोलून दाखवली.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे (Shivsena) संपर्क नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात असताना जाधव यांनी युती असताना विधानसभा निवडणुकीत भाजप (BJP) शिवसेनेचे उमेदवार कशा पद्धतीने पाडण्याचे काम केले जात होते, याबाबत भास्कर जाधव मोकळेपणाने बोलले.

संजय शिरसाट यांनी महायुती आम्हीच मोठे भाऊ असे जे विधान केले आहे. ते भाजपला सहन होत नाही. कारण, भाजपला स्वतःला मोठे व्हायचं असतं. शिवसेनेने त्यांच्यासोबत ३५ मैत्री निभावली, त्यांना संपवण्याचा घाट घातला. या विचारांच्या आणि दृष्टीची फळ आज शिंदे सेना भोगत आहे. शिरसाट यांनी ते सातत्याने बोलण्याचा धाडस दाखवावं, असे आव्हानही जाधव यांनी केले.

उद्धव ठाकरे यांनी भाजपला धडा शिकवला आहे. राज्यातील 48 ते 48 उमेदवार माझे आहेत या भावनेतून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. त्यामुळे पारिजातकाचं झाड त्यांनी फुलवलं, वाढवलं. फुल जरी दुसऱ्याच्या दारात पडली, तरी मला दुःख नाही, आनंद आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

भास्कर जाधव म्हणाले, आमचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला सळो की पळो केलं आहे. संजय राऊत यांनी केलेल्या टीका देशभरातील विविध मीडियाच्या चॅनल्सवर दाखवली जातात. संजय राऊत म्हणाले होते, ‘एक राऊत शंभर दाऊद’ त्याचीच आठवण कदाचित भाजपला होत असेल.

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
Thackeray Shivsena : ठाकरेंची शिवसेना लागली विधानसभेच्या कामाला; पूर्व विदर्भातील 14 जागांवर दावा, सक्षम उमेदवारांची चाचपणी

प्रणिती शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोलापूरमध्ये दंगली घडविण्याबाबत केलेला आरोप मीही ऐकला आहे. दोन वर्षांपूर्वी मी भाकित केलं होतं, हे दंगली घडवू शकतात. मुस्लिमांना मी सांगितलं होतं, भाजपच्या प्रचाराला बळी पडू नका. याविषयावर मी अगोदरच बोललो आहे, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

भास्कर जाधव म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजना तरी माहिती आहेत का? लोकांना 15 लाख देऊ म्हणाले होते. ही योजना आम्ही बंद पाडली नाही. गॅस सिलिंडर स्वस्त करू, असे म्हणाले होते. प्रत्येकाच्या डोक्यावर 2022 पर्यंत छत होईल अशी घोषणा केली होती, ही योजना आम्ही बंद पाडली नाही. बावनकुळेंना माहिती नाही की, नरेंद्र मोदींकडे विरोधकांवर टीका करणे, एवढेच काम आहे.

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
Kalyan Kale Vs Raosaheb Danve : खासदार काळेंनी दंड थोपटले, तिथेच रावसाहेब दानवेंचा आज दौरा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com