Buldhana News : गावाचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गेला, पण परतलाच नाही..., सरपंचपुत्राचा धरणात बुडून मृत्यू

Sarpanch Son Drowns Masrul Dam : मधुकर गणपत महाले असे मृत तरुणाचे नाव आहे. त्यांच्या आई शकुंतलाबाई महाले या मासरूळ गावच्या सरपंच आहेत. गावाच्या कामासाठी गेलेल्या मधुकर यांच्यावर काळाने घाला घातल्याने गावात शोककळा पसरली आहे.
Buldhana News | Sarpanch Son Drowns | Masrul Dam
Buldhana News | Sarpanch Son Drowns | Masrul DamSarkarnama
Published on: 
Updated on: 

Buldhana News, 20 Nov : गावाच्या पाणी पुरवठ्याची पाइपलाइन जोडण्याचे काम आटोपून धरणातून पोहत बाहेर येत असताना दम लागल्याने सरपंचपुत्राचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुलढाणा तालुक्यातील मासरूळ येथे घडली.

मधुकर गणपत महाले असे मृत तरुणाचे नाव आहे. त्यांच्या आई शकुंतलाबाई महाले या मासरूळ गावच्या सरपंच आहेत. गावाच्या कामासाठी गेलेल्या मधुकर यांच्यावर काळाने घाला घातल्याने गावात शोककळा पसरली आहे.

मासरूळ गावाला पद्मावती धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणाच्या बुडीत क्षेत्रात सार्वजनिक विहीर खोदण्यात आली असून, तेथून गावापर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीला पाइप जोडण्याचे काम करण्यासाठी मधुकर महाले आणि ग्रामपंचायत सदस्य के. के. सिनकर गुरुवारी दुपारी धरण परिसरात गेले होते.

Buldhana News | Sarpanch Son Drowns | Masrul Dam
Yogi Adityanath Mother Death: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मातृशोक; वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

काम पूर्ण झाल्यानंतर दोघेही पोहत धरणाच्या काठावर येत होते. मात्र, पाण्यात पोहताना मधुकर यांना दम लागला आणि ते बुडाले. ही बाब लक्षात येताच के. के. सिनकर यांनी काठावर येऊन ग्रामस्थांना मदतीसाठी बोलावले. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.

Buldhana News | Sarpanch Son Drowns | Masrul Dam
BJP news : भाजपला सलग दुसऱ्या दिवशी धक्का; आणखी एका महिला नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी, काँग्रेसमध्ये प्रवेशाची घोषणा

धरणात शोधमोहीम सुरू करण्यात आली. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनंतर एनडीआरएफ पथकाच्या मदतीने मधुकर यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मधुकर महाले हे ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी पुढाकार घेत असत. गावाच्या पाणीपुरवठ्याच्या कामातही ते सक्रिय होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या मधुकर यांच्या अकाली निधनाने गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.