Chandrapur Mayor : काँग्रेस खासदाराची महापौरपदासाठी भाजपसोबत 'डील'?; कष्टाने जिंकलेल्या महापालिकेतील मिटलेली भांडणं पुन्हा पेटली

Chandrapur Mayor News : काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आणि नगरसेवक पळवापळवीमुळे चंद्रपूर महापालिकेत भाजपचा महापौर होण्याची शक्यता वाढली असून धानोरकर-मुनगंटीवार भेटीची जोरदार चर्चा आहे.
Sudhir Mungantiwar-Pratibha Dhanorkar
Sudhir Mungantiwar-Pratibha DhanorkarSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur Municipal Corporation : सर्वाधिक नगरसेवक असताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद मिटत नसल्याने चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आपसात भांडणे करून आणि एकमेकांचे नगरसेवक पळवून काँग्रेसनेच ही संधी भाजपला उपलब्ध करून दिली आहे. प्राप्त माहितीनुसार खासदार धानोरकर यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली असून यात सर्व वाटाघाटी ठरल्या असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हे वृत्त खरे ठरल्यास काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.

तत्पूर्वी आमच्यातील मतभेद संपले, महापौर काँग्रेसचा होणार असा दावा काँग्रेसच्या नेत्यांमार्फत केला जात असला तरी ५ काँग्रेस नगरसेवकांना पळवून नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. खासदार प्रतिभा धानोकर यांच्याच ५ नगरसेवकांना काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते विजय वडेट्‍टीवार यांच्या समर्थकांनी पळवल्याचा आरोप आहे. या प्रकरणाती धमक्या दिल्याबद्धल वर्धा पोलिस ठाण्यात वेडट्टीवार समर्थकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे एकूण २७ नगरसेवक निवडून आले आहेत. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला आणखी ६ नगरसेवकांची गरज आहे. अधिकचे संख्याबळ गोळा करण्याची जबाबदारी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्वीकारली आहे. तत्पूर्वी वडेट्‍टीवार आणि धानोरकर यांच्यात नगरसेवकांच्या पळवापळवीवरून आधीच वाद रंगला होता. निवडणुकीनंतर खासदार धानोरकर आणि आमदार वडेट्टीवार यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी हलविले होते.

दरम्यान, या दोन नेत्यांमधील वादात प्रदेशाध्यक्षांनी हस्तक्षेप केला आणि गटनेत्याच्या नावाला संमती दिली. त्याच दिवशी गटस्थापनेसाठी धानोरकर समर्थक नगरसेवक नागपुरात पोहोचले. मात्र, गटनेत्याच्या नावाला आमदार वडेट्टीवार यांनी विरोध दर्शविला. त्यामुळे धानोरकर यांनी 13 नगरसेवकांचा काँग्रेसचा अधिकृत गट स्थापन केला. यावर दुसऱ्या गटाने आक्षेप घेतला.

Sudhir Mungantiwar-Pratibha Dhanorkar
Akola Mayor Election : सत्तेसाठी सगळं विक्रीला! तीन कोटींचा दर, दुकानांची बोली… अकोल्यात भाजपचा सत्ताबाजार उघड!

त्यानंतर प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांची ऑनलईन बैठक झाली. यात महापौरपद धानोरकर गटाकडे, स्थायी समिती वडेट्टीवार गटाकडे आणि उपमहापौरपद मित्रपक्षाला देण्याचा फॉर्म्युला ठरल्याचा दावा वडेट्‍टीवार यांनी केला होता. त्यानंतर सर्व काही सुरळीत झाले, असे मानून धानोरकर यांनी आपले नगरसेवक घरी पाठविले.

Sudhir Mungantiwar-Pratibha Dhanorkar
Chandrapur Congress Crisis : 'ते' नगरसेवक धानोरकर की वडेट्टीवारांचे ? चंद्रपूरमध्ये वाद वाढला, सत्ता जाण्याच्या भीतीने काँग्रेसमध्ये अस्वस्थता

मात्र, दुसऱ्याच दिवशी वडेट्टीवार समर्थकांनी ५ नगरसेवकांना पळवून नेल्याचा आरोप झाला. त्यातील २ नगरसेवक धानोरकर गटाकडे परतले. त्यामुळे पेच आणखी वाढला आहे. वडेट्टीवार समर्थक धानोरकर गटाला सहकार्य करण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे दोन्ही गटाला आता भाजपशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com