Former MLA Fraud Case : 15 दिवसांपासून फरार माजी आमदार कॅमेऱ्यात कैद : गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल, विधानभवनातील मुक्त वावराने राजकीय वर्तुळात खळबळ

Chikhli Former MLA Rahul Bondre fraud case : लढाणा जिल्ह्यातील चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून ते मागील 15 दिवसांपासून फरार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
Chikhli Former MLA Rahul Bondre
Chikhli Former MLA Rahul Bondresarkarnama
Published on
Updated on

Former MLA Rahul Bondre Controversy News : राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असून विधान भवनात आजी-माजी आमदारांसह राजकीय पक्षांच्या नेत्यांची वरदळ पाहायला मिळत आहे. याच गर्दीत कॅमेरात फरार असलेले चिखलीचे काँग्रेस नेते माजी आमदार राहुल बोंद्रे कैद झाले आहेत. त्यांचा विधानभवन परिसरात मुक्तपणे होणाऱ्या वावरामुळे बुलढाणा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह उठवले जात आहेत. तर याला कारण बुलढाणा पोलिसांचे उत्तर असून माजी आमदार हे 15 दिवसांपासून फरार असल्याचे म्हटलं आहे. तर बुलढाणा पोलिसांना त्यांचा शोध घेत असूनही ते सापडत नसलेल्याचे म्हटले आहे. दरम्यान आता तेच फरार माजी आमदार बोंद्रे हे विधानभवनाच्या लॉबीत फिरताना दिसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

साम टीव्हीच्या वृत्तानुसार माजी आमदार बोंद्रे फरार असून त्यांच्याविरोधात चिखली येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर स्वतःच्या शिक्षण संस्थेसाठी बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची दिशाभूल करण्याचा आरोप आहे. तसेच खोटी कागदपत्रांच्या आधारे शिक्षण संस्थांसाठी जागा आणि अनुदान लाटल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.

या प्रकरणी त्यांच्याविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून, बुलढाणा पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणात गेली 15 दिवसापासून ते फरार असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

Chikhli Former MLA Rahul Bondre
Councillor Fraud Case : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट आदेश! कोटींच्या घोटाळ्यात मोठी कारवाई, भाजप नगरसेविकेच्या पतीला बेड्या; स्वत: आहे स्वीकृत नगरसेवक

दरम्यान प्रत्यक्षात मात्र माजी आमदार बोंद्रे विधानभवन परिसरात सहजपणे वावरत असल्याचे आता समोर आले आहे. इतकेच काय ते इतरांशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत. यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यान ते विधानभवनात कसे पोहोचले? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Chikhli Former MLA Rahul Bondre
Shiv Sena Leader Fraud Case : एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा कारनामा; तीन मृत व्यक्ती जिवंत दाखवत जमीन लाटली, पोलिसही चक्रावले

तसेच जर पोलिसांना ते सापडत नसतील तर थेट विधानभवनात कसे मुक्तपणे फिरत आहेत. त्यांच्यावर कारवाई का होत नाही? असे सवाल उपस्थित केले जात आहेत. तर या सर्व घडामोडींमध्ये आता बुलढाणा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांना फरार आरोपीचा शोध घेण्यात अपयश आल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे बुलढाणा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर थेट नाराजी व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com