Congress challenges Election Commission : आम्ही दिलेल्या मत चोरीच्या पुराव्याचे काय केले? काँग्रेसने दिले निवडणूक आयोगाला आव्हान

Congress challenges Election Commission News : हूल गांधी यांच्यावर टीका करताना भाजपच्या नेत्यांनी त्यांचा एकेरी उल्लेख टाळावा, अन्यथा आम्ही जशास तसे उत्तर देऊन असाही इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्विन बैस यांनी दिला.
Election Commission, Rahul Gandhi
Election Commission, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : मत चोरीच्या आरोपावर निवडणूक आयोगाने काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांना पुरावे मागितले आहेत. सात दिवसांच्या आत शपथपत्र द्यावे, अन्यथा तुमचे सर्व आरोप खोटे आहेत हे सिद्ध होईल, असेही आयोगाने म्हटले आहे. यावर नागपूर जिल्हा काँग्रेसच्यावतीने विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही दिलेल्या पुराव्यासह तक्रारीचे काय केले हे सांगावे, अशी विचारणा करून थेट निवडणूक आयोगालाच आव्हान दिले आहे. यावेळी राहूल गांधी यांच्यावर टीका करताना भाजपच्या नेत्यांनी त्यांचा एकेरी उल्लेख टाळावा, अन्यथा आम्ही जशास तसे उत्तर देऊन असाही इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्विन बैस यांनी दिला.

अलीकडेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर जिल्हा परिषद व नागपूर महापालिकेत भाजपला (BJP) 51 टक्के मते मिळणार असल्याचा दावा केला. त्यांनी नागपूर महापालिकेत भाजपचे 120 नगरसेवक निवडून येणार असल्याचे जाहीरपणे सांगितले. मतदानापूर्वीच भाजपच्या नेत्यांना कोण जिंकणार आणि कोण पराभूत होणार हे कसे कळेत असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

Election Commission, Rahul Gandhi
BEST Election Results : "ठाकरेंना जागा दाखवली, ब्रँडच्या बॉसला..." बेस्ट निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचा ठाकरे बंधुंवर पहिला वार

भाजपने ईव्हीएम आणि संपूर्ण यंत्रणाच सेट केले असल्याचे यावरून दिसून येते. कामठी विधानसभा मतदारसंघाच्या यादीत 22 हजार 775 दुबार मतदार नावे आहेत. याची तक्रार यापूर्वीच देण्यात आली आहे. हिंगणा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार विजय घोडमारे यांनी 20 ते 22 हजार बोगस मतदारांची नावे असल्याची यादीच निवडणुकीपूर्वी सादर केली होती. त्यांनी न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केली होती.

Election Commission, Rahul Gandhi
Best Employees Credit Society Election : 'बेस्ट पतपेढी'चा निकाल; अंजली दमानियांना झालाय खूप आनंद, कारण त्यांनीच सांगितलं!

त्यांनी दिलेली माहिती खरी असल्याचे सिद्ध झाले होते. त्यानंतरही प्रशासनाने फक्त दोन हजार मतदारांची नावे वगळली. यापेक्षा अधिक पुरावे निवडणूक आयोगाला कुठले हवे आहे, अशी विचारणा काँग्रेसच्या (Congress) पदाधिकाऱ्यांनी केली. आम्ही अशा अनेक तक्रारी पुराव्यानिशी केल्या. मात्र आजवर त्याची चौकशी करण्यात आली नाही. कोणावरही कारवाई करण्यात आली नाही.

Election Commission, Rahul Gandhi
BJP Vs Rahul Gandhi: भाजपचं एकच ट्विट; बिहारमध्ये राहुल गांधी अन् तेजस्वी यादव यांच्या आरोपांचा 'तो' बॉम्ब ठरला फुसका बार

तक्रारीचा शहानिशा करण्याची आणि त्याचा शोध घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. आम्ही तक्रारी करायच्या आणि आम्हीच पुरावे गोळा करून आणून द्यायचे हा कुठला न्याय आहे. राहूल गांधी यांनीसुद्धा पुराव्यासह मत चोरीचा आरोप केला आहे. मात्र त्यांनाच आरोपी ठरवले जात आहे. त्यांच्या आरोपांमुळे भाजपचे नेते घाबरले आहेत. आयोगावर केलेल्या आरोपांचे तेच उत्तर देत फिरत आहेत.

Election Commission, Rahul Gandhi
Thackeray brothers election loss : बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा घात का झाला? 'ही' रणनीती ठरली धोकादायक

भाजपच्या नेत्यांनी राहूल गांधी यांच्यावर टीका करताना तारतम्य सोडले आहे. त्यांचा एकेरी उल्लेख केला जात आहे. हीच भाजपची संस्कृती आहे का? असा सवाल अश्विन बैस यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी कुंदा राऊत, अवंतिका लेकुरवाळे, अजय राऊत आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Election Commission, Rahul Gandhi
Vice President election India : उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ठरणार रंगतदार, भाजपच्या राधाकृष्णन यांची वाट बिकट! महाराष्ट्रातूनच बसणार मोठा धक्का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com