Anil Deshmukh : फडणवीसांविरोधात लढणं राहिलं बाजूला; काँग्रेस आमदारानेच राष्ट्रवादीला सुनावले, म्हणाले, ‘देशमुखांपेक्षा आम्हीच...’

Nagpur South West Constituency : नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसच फडणवीसांना टक्कर देऊ शकते. बाकी कोणी नाही. अनिल देशमुखांपेक्षा काँग्रेसचा उमेदवारच दक्षिण पश्चिम मतदारसंघात तगडा राहील, असा दावाही त्यांनी केला.
Devendra Fadnavis-Vikas Thakre-Anil Deshmukh
Devendra Fadnavis-Vikas Thakre-Anil DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 26 August : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर-दक्षिण पश्चिम मतदारसंघात अडकवून ठेवण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. आमदार रोहित पवार यांनीही फडणवीसांविरोधात लढण्यासाठी देशमुखांना महाविकास आघाडीची ताकद देऊ, असेही सांगितले. पण, मित्रपक्ष काँग्रेसकडूनच देशमुखांच्या संभाव्य उमेदवारीला विरोधाची टाचणी लावली.

नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघ (Nagpur South West Constituency) काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. अनिल देशमुखांपेक्षा (Anil Deshmukh) काँग्रेसचा उमेदवारच फडणवीसांना तगडी फाईट देईल, अशा शब्दांत आमदार विकास ठाकरे यांनी मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुनावले.

काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे (Vikas Thakre) म्हणाले, नागपूर दक्षिण-पश्चिम हा मतदारसंघ आघाडीत आतापर्यंत काँग्रेसच्या वाट्याला आलेला आहे. काँग्रेसच आतापर्यंत ही जागा लढवत आहे.

काँग्रेसचे संघटन, नेटवर्क आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने घेतलेली मते हे पाहता नागपूर दक्षिण पश्चिम हा मतदारसंघ काँग्रेस पक्षानेच लढवला पाहिजे. काँग्रेसच्या उमेदवाराकडून विधानसभेची तयारीही चालू केली आहे. आतापर्यंत बूथ मेळावाही झालेला आहे.

कोणतीही निवडणूक लढविण्यासाठी पूर्वतयारी लागते, पक्षाचे संघटन लागतं. मतदारसंघात हे संघटन काँग्रेसकडे आहे. आमदार रोहित पवार यांनी कशाच्या भरोशावर नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघाची मागणी केली आहे, हे मला माहिती नाही.

Devendra Fadnavis-Vikas Thakre-Anil Deshmukh
Prashant Paricharak : भालके समर्थकांची परिचारक वाड्यावर हजेरी; प्रशांत परिचारकांना दिल्या शुभेच्छा...!

हायकमांडला हे समजेल की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोणाला लढवावं. ही लढत तगडी करण्यासाठी हा मतदारसंघ लढवावा की ढिला सोडण्यासाठी लढवावं. पण, काँग्रेसच उपमुख्यमंत्र्यांना फाईट देऊ शकतो, असा दावाही ठाकरे यांनी केला.

ठाकरे म्हणाले, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवडणूक लढवायची असती, तर ते आतापर्यंत या मतदारसंघात कामाला लागले असते. नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघाचा मी रहिवासी आणि मतदार आहे. पाच वेळा वेगवेगळ्या प्रभागांतून महापालिकेची निवडणूक लढलो आहे, तसेच विधानसभेची निवडणूकही लढलो आहे. त्यामुळे मतदारसंघाचा कानानकोपरा मला माहिती आहे. आम्ही तिथंपर्यंत काँग्रेसचं संघटन पोहोचवलेलं आहे.

नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघ काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. ही जागा काँग्रेस पक्षच लढवेल. पण, अनिल देशमुख मोठे नेते आहे, ते कोणताही मतदारसंघ मागू शकतात, कोठूनही निवडणूक लढवू शकतात.

Devendra Fadnavis-Vikas Thakre-Anil Deshmukh
Ramesh kadam : मोहोळमध्ये तुतारीचा उमेदवार कोण?; पवारांनंतर रमेश कदमांनी घेतली राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची भेट

नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाबाबत माझा विचार घेतला पाहिजे. या मतदारसंघातून काँग्रेसच फडणवीसांना टक्कर देऊ शकते. बाकी कोणी नाही. अनिल देशमुखांपेक्षा काँग्रेसचा उमेदवारच दक्षिण पश्चिम मतदारसंघात तगडा राहील, असा दावाही त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com