Shivsena News: एकनाथ शिंदेंनी अमरावतीत बघता बघता दुसरा बडा नेताही फोडला; भाजप अन् काँग्रेसवाले पाहतच राहिले; राणांविरोधातला चेहरा ठरला?

Amravati Politics: विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री व प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी हाती धनुष्यबाण घेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर त्यांच्या गळ्यात विधानपरिषदेच्या आमदारकीची माळ पडली. आता यानंतर पंधराच दिवसांच्या आतच शिंदेंनी विदर्भातला दुसरा बडा नेता फोडला आहे.
Eknath Shinde Navneet Rana Balwant Wankhede  (1).jpg
Eknath Shinde Navneet Rana Balwant Wankhede (1).jpgSarkarnama
Published on
Updated on

Amravati News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका 2029 मिशनसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करण्यासह इतर पक्षातील ताकदवान नेत्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी त्यांनी फासे टाकण्यास सुरुवात केली आहे. अशातच विदर्भातील अमरावतीत शिंदेंनी दुसरा बडा नेता फोडत काँग्रेससह भाजपसमोरही तगडं आव्हान उभं केलं आहे.

विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री व प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी हाती धनुष्यबाण घेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर त्यांच्या गळ्यात विधानपरिषदेच्या आमदारकीची माळ पडली. आता यानंतर पंधराच दिवसांच्या आतच शिंदेंनी विदर्भातला दुसरा बडा नेता फोडला आहे.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचे माजी आमदार काँग्रेसचे ताकदवान नेते व दर्यापूरचे माजी आमदार सुधाकर भारसाकळे हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. भारसाकळे यांचा शिवसेना पक्षप्रवेश काँग्रेससाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपंचायती, पंचायत समिती यांसह विधानपरिषदेच्या निवडणुकाही पार पडल्यानं आता सर्वच राजकीय पक्षांनी संघटनात्मक बांधणीवर लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे शिंदेंकडून राज्यात शिवसेना पक्ष अधिकाधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.

Eknath Shinde Navneet Rana Balwant Wankhede  (1).jpg
MLC Election 2026 : परभणी- हिंगोलीची जागा कोण लढवणार? इच्छुकांच्या अर्ज करण्यासाठी पहिल्याच दिवशी उड्या!

अमरावतीच्या जिल्ह्याच्या राजकारणातलं मोठं प्रस्थ असलेल्या माजी आमदार सुधाकर भारसाकळे यांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र करत थेट शिवसेनेची वाट धरली आहे. ते येत्या दोन-तीन दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

सुधाकर भारसाकळे यांनी मंगळवारी (ता.26 मे) कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. याच मेळाव्यात त्यांनी आपल्या आगामी नव्या राजकीय वाटचालीबाबतचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश करण्याबाबतचा निर्णय सांगितला आहे.

Eknath Shinde Navneet Rana Balwant Wankhede  (1).jpg
Congress corporators missing : काँग्रेसने आधी स्वतःचे नगरसेवक शोधावेत; बावनकुळेंचा टोला, महायुती 17 पैकी 17 जागा जिंकणार असल्याचा दावा

सुधाकर भारसाकळे मेळाव्यातील भाषणात म्हणाले, 'मी आता नवी राजकीय वाट शोधली आहे. त्या वाटेनं मला जायचं आहे. तुम्हीही माझ्यासोबत राहणार आहात. पण कधीही तुम्हाला चुकीच्या वाटेवर घेऊन जाणार नसल्याची ग्वाहीही या निमित्तानं त्यांनी समर्थकांना दिली.

ते म्हणाले, जसं आपण काँग्रेसला मोठं केलं,त्याच पद्धतीनं शिवसेनेलाही पुढे घेऊन जाणार आहोत. आपण लवकरच म्हणजे दोन-तीन दिवसांत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. यावेळी आपल्यासोबत दबंग नेतृत्व बच्चू कडू असणार आहेत. त्यांच्या माध्यमातून आणि तुमच्या साक्षीनं शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं भारसाकळे यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com