Politics : बच्चू कडूंचा शिंदेंना घरचा आहेर; म्हणाले, धनुष्यबाण, शिवसेनेवरील दावा टाळायला हवा होता

Bachhu Kadu : ''आमची लायकी नसेल म्हणून मंत्रीमंडळात समाविष्ट केलं नसेल''
Eknath Shinde and Bachhu Kadu
Eknath Shinde and Bachhu Kadu Sarkarnama
Published on
Updated on

Politics :''एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले इथपर्यंत ठिक होतं. पण धनुष्यबाण आणि शिवसेनेवर एकनाथ शिंदे यांनी केलेला दावा हा टाळायला पाहिजे होता'', असं विधान शिंदे गटातील आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ते आज एका वृत्तवाहीनीशी बोलत होते. यावेळी त्यांनी हे भाष्य केलं.

यावेळी बच्चू कडू म्हणाले, ''शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे राज्यात आणि जनतेमध्ये नकारात्मक वातावरण तयार झालं. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे ही नकारात्मता दूर करतील.

यामध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले इथपर्यंत ठिक होतं. पण, त्यांनी धनुष्यबाण व शिवसेनेवर केलेला दावा हा टाळायला हवा होता'', असा सल्ला देत बच्चू कडू यांनी शिंदे यांना घरचा आहेर दिला.

Eknath Shinde and Bachhu Kadu
Nashik Graduate Election : नाशिकमध्ये सत्यजीत तांबे पुढे; पण विजयासाठी झुंजावे लागणार...

पुढे बच्चू कडू म्हणाले, ''याबाबत एकनाथ शिंदे यांना हे बोलून दाखवलं होतं. मात्र, राजकारणात कसं असतं काहीही झालं तरी सत्ता पाहिजे असती, हा राजकारणी लोकांचा धर्म असतो'', असं ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबतही भाष्य केलं.

ते म्हणाले, ''उद्धव ठाकरे यांना पदावरून खाली केल्यामुळे जनतेत त्यांच्याबाबत सहानभुती आहे. ही सहानभुती आज देखील कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या कामात दम आहे. कारण ते रात्री दोन वाजता देखील सामान्य माणसासाठी उपलब्ध असतात. अशी आपुलकीही पाहिजे'', असंही बच्चू कडू म्हणाले.

Eknath Shinde and Bachhu Kadu
Kasaba By-Election : मुलाची प्रदेश प्रवक्तेपदी झालेली निवड वडील शैलेश टिळकांना उमेदवारीपासून दूर नेणार?

यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात दिव्यांग मंत्रालय झालं. याबाबतही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, ''आता दिव्यांग मंत्रालय झालं. पण हे उद्धव ठाकरे असते तर झालं नसतं. हे फक्त एकनाथ शिंदे यांच्यामुळे झालं. आता फक्त दिव्यांग मंत्रालयाचा मंत्री केलं तर अजून तळागळात जाऊन काम करता येईल'', असंही कडू म्हणाले.

Eknath Shinde and Bachhu Kadu
Nashik Graduate Election : सत्यजीत तांबेंना दुसऱ्या फेरी अखेर ३१ हजार मतं; तर शुभांगी पाटलांना...

दरम्यान, यावेळी त्यांनी मंत्रीमंडळ विस्ताराबाबतही भाष्य केलं. ''येणारे सरकार हे लहान पक्षाचे असेल असं म्हणालो होतो. पण त्यानंतर दोन दिवसांत शिवसेनेत बंडखोरी झाली. यामुळे लोकांना वाटलं हे सर्व बच्चू कडू यांनी केलं. पण असं काहीही नाही. मी असं केलं असतं तर पहिल्या मंत्रीमंडळात मला समाविष्ट केलं असतं'', असं म्हणत ''आमची लायकी नसेल म्हणून समाविष्ट केलं नसेल'', असा टोलाही त्यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com