Mahayuti News : मनासारखे घडेना, महायुतीतील 'नाराजीनाट्य' काही संपेना; आता 'या' कारणावरून शिवसेनेचे मंत्री नाराज

Political News : मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना व भाजपमध्ये चुरस पहावयास मिळाली. त्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवस नाराज होते. त्यांची नाराजी दूर झाल्यानंतर पुन्हा गृहमंत्रिपदाची मागणी करीत शिवसेनेने नाराजी व्यक्त केली.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर महायुती सरकारने सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर सुरुवातीच्या काळात मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना व भाजपमध्ये चुरस पहावयास मिळाली. त्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवस नाराज होते. त्यांची नाराजी दूर झाल्यानंतर पुन्हा गृहमंत्रिपदाची मागणी करीत शिवसेनेने नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मंत्रीपदांचे वाटप आणि शेवटी खातेवाटप या बाबी टप्प्याटप्प्याने चर्चेत राहिल्या. यासाठी महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांत चुरस दिसून आली.

खातेवाटप झाल्यानंतर गेल्या दोन दिवसापासून पालकमंत्रीपदांवरून महायुतीमधील तीन पक्ष दावे करीत असतानाच आता मंत्र्यांना दालन देण्यात आले तर बंगल्यांचेही वाटप करण्यात आले. मात्र, या बंगले वाटपावरून आता शिवसेनेतील (Shivsena) काही मंत्री नाराज असल्याचे पुढे आले आहे. मंत्रिमंडळातील एकनाथ शिंदेच्या शिलेदारांनी पुढे येत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

Eknath Shinde
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये शनिवारी निघणार सर्वपक्षीय मोर्चा!

दरम्यान, खाते वाटपानंतर आता नव्या मंत्र्यांना बंगल्याचं वाटप देखील करण्यात आले आहे. मात्र, बंगल्याचं वाटप करत असताना भाजपच्या मंत्र्यांना बंगले देण्यात आले आहेत. तर शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना मात्र बंगल्याऐवजी फ्लॅट देण्यात आले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे, शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay shirsat), प्रताप सरनाईक आणि भरत गोगावले यांना बंगल्याऐवजी फ्लॅट देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Eknath Shinde
Santosh Deshmukh Murder Case : 'संतोषवर वार करणाऱ्यांना फाशीच्या तख्तापर्यंत सरकार नेणार'; मंत्री संजय शिरसाट म्हणाले, 'बीड खतरनाक...'

एकीकडे भाजपच्या मंत्र्यांना बंगले देण्यात आले आहेत तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांना फ्लॅट मिळाल्यामुळे मंत्र्यांनी खंत व्यक्त केली. भाजपच्या मंत्र्यांना बंगले मिळाले तर शिवसेनेच्या काही मंत्र्यांना मात्र फ्लॅट देण्यात आला आहे. त्यामुळे सेनेच्या मंत्र्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.

Eknath Shinde
NCP Politics : शरद पवारांची राष्ट्रवादी होऊ लागली रिकामी; अनेकजण अजितदादांच्या संपर्कात?

दरम्यान, वेगवेगळ्या कारणामुळे महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात या-ना त्या कारणाने नाराजी व्यक्त केली जात असल्याने ही नाराजी दूर करण्यातच पक्षातील ज्येष्ठ मंडळींचा वेळ जात आहे.

Eknath Shinde
Devendra Fadnavis, Chhagan Bhujbal : मंत्रिपद नाकारलं, नाराजीचा उद्रेक आता भुजबळांबाबत सीएम फडणवीसांचे मोठे संकेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com