Bacchu Kadu Vs Krishna Khopde : अहो खोपडे, तुम्हाला काय खोपडी आहे का?: बच्चू कडू एवढे का संतापले

Nagpur Corportion Election 2026 : पूर्व नागपूरमध्ये भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षातून बंडखोरी केली असून धमकीच्या आरोपांवरून बच्चू कडूंनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
Krishna Khopde-Bacchu Kadu
Krishna Khopde-Bacchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 10 January : पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ हा भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यांच्‍या मतदारसंघात भाजपच्या तीन कार्यकर्त्यांनी बंडाचे निशान फडकावले आहे. हे तीनही उमेदवार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून महापालिकेची निवडणूक लढवत आहेत. आमदार खोपडे हे आपल्याला धमक्या देत आहेत, अशी तक्रार उमेदवारांनी केली असून कडू यांनी त्याचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला.

मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारचे नाक दाबून तोंड उघडले, धमक्यांचे प्रकार मी खपवून घेणार नाही. अहो खोपडे, तुम्हाला खोपडी असेल तर माझ्यासमोर या, असे चॅलेंज माजी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी दिले आहे. यावरून आता पुन्हा वाद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बच्चू कडू म्हणाले, सरकारने विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी (Assembly Election) शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. वर्षभर नुसती चालढकल सुरू होती. योग्य वेळी सातबारा कोरा करू, असे सांगितले जात होते. त्यामुळे आम्ही सरकारचे नाक दाबले, त्यामुळे त्यांना तोंड उघडावे लागले. कर्जमाफीची तारीख जाहीर करावी लागली.

राजकारणात पदावर असो वा नसो, कामे थांबत नाहीत. मी आमदार नाही, तरीही शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दाखवली, हे सरकारने व आमदार खोपडे यांनी लक्षात ठेवावे. त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते प्रहारच्या वतीने रिंगणात उतरल्यामुळे आमदार खोपडे हे धमकी देत असून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे प्रकार चालणार नाहीत. आमदार खोपडे यांना खरोखरच खोपडी आहे का, असा सवालही कडू यांनी उपस्थित केला.

Krishna Khopde-Bacchu Kadu
Chandrakant Patil: पिंजरा ते नटसम्राट! दोन्ही पाटलांमध्ये जुंपली; जयंतरावांची अवस्था नटसम्राटासारखी...

आमदार खोपडे यांनी कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याविरोधात तक्रार केली होती. दिव्यांग सचिव म्हणून नियुक्तीनंतर मुंडे यांनी बोगस दिव्यांग प्रकरणे उघडकीस आणली. त्यांच्याविरोधात कटकारस्थान रचण्यात आले, मात्र अखेर सत्याचाच विजय झाला.

Krishna Khopde-Bacchu Kadu
Audio Clip Viral : एकनाथ शिदेंच्या माजी महापौरांची ऑडिओ क्लिप व्हायरल; वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद; मीनाक्षी शिंदेंनी बाजू मांडली!

कोणावरही दबाव टाकू नये. कुणी धमकावत असेल तर मला सांगा, मी व्यवस्था करून घेईन. जनतेची कामे करणे हेच लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे, असे आवाहन करत कडू यांनी आजच्या राजकारण्यांवर जोरदार टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com