DYCM Ajit Pawar News : मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या नेत्यांचा ‘असा’ झाला गेम !

Nagpur : मंत्रिपदाच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरलेली बघायला मिळते आहे.
Krishna Khopde, Sameer Meghe and Ashish Jaiswal
Krishna Khopde, Sameer Meghe and Ashish JaiswalSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ajit Pawar News in Marathi : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अजित पवार यांनी इतिहासातील सर्वात मोठे बंड केले आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याने महाराष्ट्रातील राजकारणावर याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. विदर्भात राष्ट्रवादीची फारशी ताकद नसली तरी या बंडाने अनेकांचे मंत्रिपदाचे स्वप्न भंगणार आहे. (This will have far-reaching effects on politics in Maharashtra)

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या खेळीने राज्याच्या राजकारणावरच नाही, तर मंत्रिमंडळावरही परिणाम झाला आहे. त्यांच्या खेळीने मंत्रिपदाची आस लावून असलेल्यांचा जिल्ह्यातील नेत्यांचा गेम झाला. मंत्रिपदाच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरलेली बघायला मिळते आहे.

साडेतीन वर्षापूर्वी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत भल्या पहाटे सत्ता स्थापन करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर मात्र राजकारण वेगाने बदलले. शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसची महाविकास आघाडीची सत्ता आली. त्यानंतर शिवसेनेत बंड झाले. एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली.

अजित पवार यांनी पहाटेचा कार्यक्रम आज भर दुपारी केला. फरक येढवाच की यावेळी त्यांची खेळी फसणार नसल्याचे बोलले जात आहे. भाजपसोबत सत्तास्थापनेसाठी वेगवेगळे तर्क लावण्यात आले होते. अजित पवारांच्या या बंडामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चा होत आहेत. भविष्यात याचे पडसाद दिसून येतील.

Krishna Khopde, Sameer Meghe and Ashish Jaiswal
Ajit Pawar NCP Office: राष्ट्रवादीच्या कार्यालयावर अजित पवार गटाचा दावा !

अजित पवारांच्या या खेळीने अजित पवार समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे अनेकांचे स्वप्न भंगणार आहे. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चर्चा होती. त्या विस्तारात नागपूर जिल्‍ह्यातील एक किंवा दोन आमदारांना स्थान मिळण्याची चर्चा होती. भाजपमधून प्रवीण दटके, कृष्णा खोपडे व समीर मेघे यातून एकाला संधी मिळणार असल्याची भाजपमध्ये दबक्या आवाजात चर्चा होती.

शिवसेनेमधून (शिंदे गट) आशिष जयस्वाल यांच्या नावाची चर्चा होती. परंतु, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या आमदारांनी सत्तेत सहभाग घेतला. त्यांच्यासह नऊ जणांना मंत्रिपदाची रविवारी शपथ देण्यात आली. त्यामुळे आता लगतच्या काळात मंत्रिमंडळ विस्तार होणार असला तरी कोणाला मंत्रिपद मिळेल, हे आता काळच ठरवणार आहे.

Krishna Khopde, Sameer Meghe and Ashish Jaiswal
Ajit Pawar Big Step : काॅंग्रेस नेते म्हणतात, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचे हे अखेरचे अधिवेशन !

..तर मिळणार मंत्रिपद

एकनाथ शिंदेसह (Eknath Shinde) त्यांचे समर्थक मंत्री व आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. विधानसभा अध्यक्षांचा निर्णय विरोधात गेल्यास सर्वांचे सदस्यत्व जाईल. अशा परिस्थितीत नागपुरातील (Nagpur) आमदारांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.