Jalgaon News : शिवतीर्थ मैदानावर न्यायासाठी उपोषण करणाऱ्या तरुणाच्या कानशिलात गटविकास अधिकाऱ्याने लगावली; व्हिडिओ व्हायरल

Pachora BDO Rajesh Ingale Case : पाचोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश इंगळे यांनी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या रोहित देसले यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.
Jalgaon News | Pachora BDO Rajesh Ingale Controversy
Jalgaon News | Pachora BDO Rajesh Ingale ControversySarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon News, 23 Nov : पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील विकासकामांच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद आता चिघळला आहे. जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर सुरू असलेल्या आमरण उपोषणस्थळीच एका प्रशासकीय अधिकाऱ्याने तरुणाच्या कानशिलात लगावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पाचोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश इंगळे यांनी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या रोहित देसले यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. जारगाव येथील तरुण पंकज पाटील यांनी २ ऑक्टोबर रोजी गावाच्या विकासकामांवरून तत्कालीन सरपंचांना जाब विचारला होता.

त्यावेळी झालेल्या वादातून माजी सरपंचांनी पंकज पाटील यांच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओही त्यावेळी व्हायरल झाला होता. मात्र, या प्रकरणात अद्याप न्याय मिळाला नसल्याचा आरोप पंकज पाटील यांनी केला आहे. याच मागणीसाठी त्यांनी गेल्या पाच ते सहा दिवसांपासून जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे.

Jalgaon News | Pachora BDO Rajesh Ingale Controversy
Beed Teacher News : शिक्षण विभागाचा मोठा दणका! बोगस भरती प्रकरणात 73 शिक्षकांना घरचा रस्ता; आणखी 2,217 पदे संशयाच्या भोवऱ्यात

दरम्यान, पंकज पाटील यांच्या उपोषणाला त्यांच्याच तालुक्यातील रोहित देसले यांनी पाठिंबा दिला होता. तेही अन्य मागण्यांसाठी पंकज पाटील यांच्या शेजारी उपोषणाला बसले होते. अशातच दुपारी दोनच्या सुमारास पाचोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश इंगळे हे उपोषणस्थळी आले.

यावेळी त्यांनी पंकज पाटील यांना उपोषण मागे घेण्याबाबत धमकावल्याचा आणि दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार सुरू असताना शेजारी उपोषणाला बसलेल्या रोहित देसले यांनी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात केली. याचा राग आल्याने गटविकास अधिकारी राजेश इंगळे यांनी रोहित देसले यांच्या कानशिलात लगावल्याचा आरोप आहे.

Jalgaon News | Pachora BDO Rajesh Ingale Controversy
Majalgaon Car Accident : शर्यतीच्या नादात भरधाव कारची दुचाकीला धडक; दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू, भाजप नगरसेवकाच्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल

विशेष म्हणजे, या घटनेचा व्हिडिओ रोहित देसले यांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. उपोषणस्थळी घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांशी अधिकाऱ्यांनी कसे वागावे, यावरूनही चर्चा सुरू झाली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मात्र, या प्रकरणी प्रशासनाकडून अद्याप त्यांची भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे आरोपांतील सत्यता नेमकी काय आहे हे तपासातूनच समोर येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.