Lok Sabha Election 2024 : डॉ. फुकेंच्या घरी कुलस्ते यांनी चितारलेल्या कमळाची दोन्ही जिल्ह्यांत चर्चा !

Bhandara-Gondia : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार कोण?
Dr. Parinay Fuke, Faggansing Kulaste and Sunil Mendhe
Dr. Parinay Fuke, Faggansing Kulaste and Sunil MendheSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : केंद्रीय ग्रामविकास व पोलाद राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते दोन दिवस भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. मतदारसंघाच्या आढाव्यासोबतच, बूथ आढावा आणि कार्यकर्ता बैठकीसाठी ते २२ आणि २३ फेब्रुवारीला होते. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथील पदाधिकाऱ्यांची बैठक आटोपून खासदार सुनील मेंढे यांच्यासह ते लाखनी या गावी माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांच्या निवासस्थानी पोहोचले.

विद्यमान खासदारांना सोबत घेऊन कुलस्ते डॉ. परिणय फुकेंच्या घरी गेले, याचे निरनिराळे अर्थ लावले जात आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत महायुतीमध्ये अनिश्‍चितता असताना कुलस्ते यांच्या कालच्या भेटीनंतर भाजप उमेदवार बदलणार तर नाही ना, या चर्चेने जोर धरला आहे. भाजप या वेळी उमेदवार बदलणार म्हणून डॉ. फुकेंनी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या लाखनी या गावात घर घेतल्याचेही राजकीय जाणकार सांगतात.

लाखनी येथे खरी चर्चा झाली ती कुलस्ते यांनी डॉ. फुके यांच्या घराच्या भिंतीवर चितारलेल्या कमळाची. ‘कमळ’चे चित्र काढताना त्यांच्या कुंचल्याकडे कार्यकर्ते कौतुकाने पाहत होते. दरम्यान, विद्यमान खासदार सुनील मेंढे आणि माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांच्यात लोकसभेच्या उमेदवारीवरून चढाओढ सुरू असताना 'कोण बरे भरणार या कमळात रंग’ हा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dr. Parinay Fuke, Faggansing Kulaste and Sunil Mendhe
Gondia Congress Dispute : निडणुकीपूर्वी अंतर्गत कलह पोहोचला शिगेला

लोकसभा 2024 निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्यात केव्हाही जाहीर होऊ शकते. अशात भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार कोण, याची चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. भाजपसह महायुतीत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने भंडारा-गोंदिया मतदारसंघावर आपली दावेदारी प्रस्थापित केली होती. सर्वांचे लक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल हे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे लागले होते.

प्रफुल्ल पटेल यांनी आठ दिवसांपूर्वीच यावर येत्या दोन दिवसांत निर्णय होईल, असे सांगितले होते. त्यातच आता त्यांना राष्ट्रवादीकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभेचा कालावधी शिल्लक असताना त्यांना पुन्हा उमेदवारी देण्याचे समीकरण अनेकांच्या पचनी पडले नाही. या समीकरणाने मात्र भाजपने सुवर्णमध्य साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

खासदार प्रफुल्ल पटेल राज्यसभेवर गेल्याने आता भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार राहणार, हे निश्चित झाले. दरम्यान, लोकसभेसाठी विद्यमान खासदार सुनील मेंढे आणि माजी मंत्री परिणय फुके प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भाजप ‘सिटिंग - गेटिंग’चा फॉर्म्युला लावते की ‘नवा गडी - नवा राज’चे सूत्र अवलंबते, यावर पुढील समीकरण अवलंबून राहणार आहे.

भाजपने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून कुणबी समाजाचा उमेदवार देण्याचे निश्चित केले आहे. याला भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डनेसुद्धा हिरवा कंदील दाखविल्याची माहिती आहे. यासाठी भाजपकडून तीन-चार नावांची चर्चा असली, तरी विद्यमान खासदार सुनील मेंढे आणि माजी मंत्री परिणय फुके यांची नावे आघाडीवर आहेत. त्यामुळे या दोघांपैकीच कुणीतरी एक उमेदवार असणार, हे निश्चित आहे. येत्या काही दिवसांत भाजप भंडारा गोंदिया-लोकसभा मतदारसंघावर आपला अधिकृत उमेदवार जाहीर करेल, याची शक्यता आता बळावली आहे.

Dr. Parinay Fuke, Faggansing Kulaste and Sunil Mendhe
Bhandara Zilla Parishad : विनापरवानगी सीईओंची भेट शिक्षकाला भोवली

दरम्यान, दिल्ली येथे झालेल्या भाजपच्या अधिवेशनात विद्यमान खासदार सुनील मेंढे, माजी राज्यमंत्री परिणय फुके यांनीसुद्धा हजेरी लावली. यात डॉ. परिणय फुके यांनी स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत सहजासहजी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघावरील हक्क सोडणार नसल्याचे दाखवून दिले. त्यामुळे दोघेही ताकदीने तिकिटासाठी आपला जोर लावत असताना भाजप कार्यकर्ते मात्र तिकीट कोणालाही मिळू दे, आपण पक्षासाठी ताकदीने लढणार आणि विजय खेचून आणणार, या भूमिकेत आहेत.

Edited By : Atul Mehere

R

Dr. Parinay Fuke, Faggansing Kulaste and Sunil Mendhe
Gondia ZP News : ग्रामपंचायतीच्या अधिकारावर जिल्हा परिषद सदस्यांचे अतिक्रमण !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com