Loksabha Election 2024 : मतदानाचा पहिला टप्पा; प्रशासनाची जम्बो तयारी; 10 हजारांवर पोलिसांचा बंंदोबस्त

Nagpur- Ramtek Voting Process : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी देशभरात 102 मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात शुक्रवारी 19 एप्रिलला मतदान होत आहे.
Lok sabha election
Lok sabha electionsarkarnama

Vidarbha News: केंद्रीय निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.त्यात संपूर्ण देशात सात टप्प्यांत निवडणुका होतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जाहीर केले होते. त्यात देशात 19 एप्रिल ते 1 जून अशा 7 टप्प्यांत मतदान होणार आहे. तर लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर केला जाणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मतदानाचा पहिला टप्पा हा गुरुवारी (ता. 19 एप्रिल) रोजी पार पडणार आहे.तर दुसरा टप्पा 26 एप्रिल होणार आहे.

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात रामटेक,नागपूर,भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर,चंद्रपूर येथे मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर नागपूर आणि रामटेक मतदारसंघात सुमारे दहा हजारांच्यावर पोलिस अधिकारी,कर्मचारी,निमलष्करी दल,केंद्रीय सशस्त्र दलाचा बंदोबस्त तैनात असणार आहे.

Lok sabha election
Loksabha Election : सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी 'काय पण', अजितदादा घेणार हर्षवर्धन पाटलांची भेट

लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) घोषणा होऊन महिन्याभराहून अधिकचा कालावधी उलटला आहे.त्यात आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सत्ताधारी व विरोधकांनी सोडली नाही.त्यामुळे प्रचार शिगेला पोचला होता.ऐन उन्हाळ्यात निवडणुकांमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी देशभरात 102 मतदारसंघात मतदान होणार आहे.त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात शुक्रवारी 19 एप्रिलला मतदान होत आहे.या पाच मतदारसंघांतील शिगेला पोचलेला प्रचार बुधवारी सायंकाळी पाच वाजता थंडावला.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या उमेदवारीमुळे नागपूर मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल आणि पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रकार परिषदेत मतदान प्रकियेसाठी करण्यात आलेल्या पोलिस प्रशासन यंत्रणेच्या नियोजनाविषयी माहिती दिली आहे.यावेळी त्यांनी 1 हजार 625 प्रतिबंधक कारवाई केली असल्याचेही सांगितले.या पत्रकार परिषदेला सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे, अप्पर पोलिस आयुक्त संजय पाटील,गुन्हे शाखेचे उपायुक्त निमित गोयल, विशेष शाखेच्या श्वेता खेडकर उपस्थित होत्या.

याठिकाणी 3 अप्पर पोलिस आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली 10 पोलिस उपायुक्त, 17 सहाय्यक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक असे एकूण 321 पोलिस अधिकारी तसेच 3 हजार 218 पोलिस अंमलदार व 943 महिला पोलिस व साध्या वेशातील पोलिसही बंदोबस्तात असतील.6 हजार 319 पोलिसांची तैनात राहणार आहे.

याशिवाय निमलष्करी दलाचे म्हणजे सीआयएसएफचे दोन कंपन्या, आरपीएफ-1 आणि कर्नाटक राज्य पोलिसांच्या दोन कंपन्यांवर सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याचवेळी शहर पोलिसांच्या मदतीला राज्यातील १ हजार 350 आणि छत्तीसगड राज्यातील 500 होमगार्ड सैनिक नियुक्त करण्यात आले आहेत. असे एकूण 6 हजार 319 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.यामुळे कडक पोलिस बंदोबस्तात गुरुवारी विदर्भातील मतदानाचा (Voting) पहिला टप्पा पार पडणार आहे.

Lok sabha election
Vasant More News : मोरेंना पंतप्रधान व्हायचंय, ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत, 'राज'पुत्राची टीका !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com