Pune News : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने मोठा डाव टाकतानाच बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे आता बारामतीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नणंद भावजयची लढत पाहायला मिळणार आहे. (Latest Marathi News)
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही वेळातच सुनेत्रा पवार यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. सुनेत्रा पवार म्हणाल्या, "अजितदादांनी (Ajit Pawar) राष्ट्रप्रथम अशी भूमिका घेतलेली आहे. बारामतीची निवडणूक राष्ट्राची निवडणूक आहे, ही कौटुंबिक निवडणूक नाही. या निवडणुकीत अनेक मुद्दे आहेत. युवकांचे प्रश्न आहेत.बेरोजगारांचे प्रश्न आहे. महिलांचे प्रश्न आहे. शेतीचे समस्या आहेत. पाणी प्रश्न आहे. लोकांना बारामतीत बदल हवा आहे."
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बारामती लोकसभा मतदारसंघ हा राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ बनला आहे. कारण या मतदारसंघामध्ये पवार कुटुंबीयांमध्ये प्रतिष्ठेची लढाई रंगणार आहे. त्यामुळे ही निवडणूक कोण जिंकणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. याचवेळी भाजपने केलेलं फोडाफोडीचं राजकारण लोकांना आवडलेलं नसून बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) या अडीच लाख मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास आमदार रोहित पवारांनी पुरंदरमध्ये व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.