Crime News : अधिवेशनला गेलेल्या आमदारांच्या घरात चोरी, रोख रक्कम आणि स्वाक्षरीचा धनादेशावर हात साफ; मात्र एका चुकीने चोर फसला

Umred MLA Sanjay Meshram Bungalow Theft : राजुराचे माजी आमदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. प्रभाकरराव मामुलकर यांच्या पत्नी सुमनताई मामुलकर यांची जवळपास पाच कोटी रुपयांच्या मालमत्तेची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला होता.
Umred MLA Bungalow Theft
Umred MLA Bungalow Theftsarkarnama
Published on
Updated on

Nagpur Crime News : राजुराचे माजी आमदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. प्रभाकरराव मामुलकर यांच्या पत्नी सुमनताई मामुलकर यांची जवळपास पाच कोटी रुपयांच्या मालमत्तेची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली असतानाच आमदार संजय मेश्राम यांच्या बंगल्यात घरफोडी झाल्याचे समोर आले आहे. चोरट्याने रोख रक्कम आणि स्वाक्षरी केलेला धनादेश चोरला. मात्र त्याच्या एका चुकीने आणि बँक कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे चोर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याचे नाव धनंजय गणवीर (वय ३०, रा. बांबूवन, हुडकेश्वर) असे असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

उमरेड काँग्रेसचे आमदार संजय मेश्राम सध्या मुंबईत पावसाळी अधिवेशनासाठी गेले आहेत. याचाच गैरफायदा घेत चोरट्याने विहीरगाव येथील पर्ल हेरिटेज सोसायटीमध्ये मेश्राम यांचा बंगल्यात धाडसी चोरी केली. चोरट्याने सोमवारी (ता.6) पहाटे फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून फ्लॅटमध्ये प्रेवश केला. तसेच बॅगेतील ७५ हजारांची रोख रक्कम आणि धनादेशाची चोरी केली.

यानंतर लगेच चोर धनंजय गणवीर याने धरमपेठेतील बँक ऑफ इंडिया गाठत येथे तीन लाख रुपयांचा धनादेश वठवण्यासाठी काउंटरवर जमा केला. यावेळी त्याने धनादेशासोबत ओडिशातील रेहमान नावाच्या व्यक्तीचे ओळखपत्राची छायांकित प्रत दिली. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील मास्क आणि मात्र, त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे बँक कर्मचाऱ्यांना संशय आला.

Umred MLA Bungalow Theft
Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी PSI ला अटक, पोलीस विभागात एकच खळबळ; अटकेनंतर थेट...

ज्यानंतर बँक कर्मचार्‍याने बँकेत सध्या २.५० लाख असून उर्वरित ५० हजार रुपये काही वेळाने दिले जातील. थोडा वेळ लागेल असे उत्तर दिले. यामुळे धनंजय गणवीर याने आपण थोड्या वेळानंतर येऊ असे म्हणत बँकेतून बाहेर पडला. यादरम्यान बँक खात्यातून ३ लाख रुपये डेबिट झाल्याचा मॅसेज आमदार मेश्राम यांच्या मोबाइलवर गेला.

यावेळी मेश्राम यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून सर्व माहिती दिली. यानंतर हुडकेश्वर पोलिसांच्या पथकाने बँकेत जाऊन सापळा रचला आणि कॅशियरकडून पैसे घेताना चोराला बेड्या ठोकत जेरबंद केले. पोलीसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी धनंजय गणवीर हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर चोरी, घरफोडी आणि इतर स्वरूपाचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर या चोरीच्या प्रकरणात आणखी कोणाशी संबंध आहे का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान राजुराचे माजी आमदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. प्रभाकरराव मामुलकर यांच्या पत्नी सुमनताई मामुलकर यांनी देखील आपली जवळपास पाच कोटी रुपयांच्या मालमत्तेची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली असून करोडोची मालमत्ता असणाऱ्या सुमनताई मामूलकर यांच्यावर आता बेघर होण्याची वेळ आली आहे. यावेळी सुमनताई मामुलकर यांनी नात्यातीलच व्यक्तींनी विश्वासघात केल्यामुळे ही पाळी ओढवली असल्याची प्रतिक्रिया पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

Umred MLA Bungalow Theft
Crime News : एकनाथ शिंदेंच्या नगरसेवकाला महिला डॉक्टर, नर्सला मारहाण भोवणार, 'तो' व्हिडिओही आला समोर! गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

पेन्शनची रक्कमही परस्पर उचलली

माजी आमदारांचे पेन्शन चाळीस हजार रुपये सुमनताई मामुलकर यांच्या खात्यावर येत होते. मात्र, परस्पर ही रक्कम अभिजित भुते यांनी आपल्या खात्याला जोडली. त्यामुळे हा प्रकार लक्षात येतात नातेवाईकाने बँकेकडे तक्रार केली. त्यानंतर ते खाते बंद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com