
Nagpur News,11 Feb : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत (Indrajeet Sawant) यांना धमकी प्रकरणी चर्चेत आलेला आणि अडचणीत सापडलेल्या प्रशांत कोरटकरने नागपूर पोलिसांकडे आपल्या जीवाला धोका असल्याचं कारण देत सुरक्षा पुरवण्याची मागणी केल्याची माठी बातमी समोर आली आहे.
यासाठी त्याने दोन दिवसांपूर्वी आपल्या वकीलाला नागपूर (Nagpur) पोलिस आयुक्तांकडे पाठवल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या जीवा धोका असल्यामुळे सुरक्षा मिळावी, अशी मागणी करणारा अर्ज त्याने वकिलांमार्फत पोलिसांकडे दिला होता.
मात्र, पोलिसांनी तत्काळ सुरक्षा देण्यास देण्यास मान्यता दिली नाही. तसंच विचार करून योग्य तो निर्णय घेऊ अशी भूमिका घेतली पोलिसांनी घेतली आहे. त्यामुळे कोरटकरला पोलिसांकडून सुरक्षा पुरवली जाणार की नाही? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, इंद्रजीत सावंत यांनी धमकी दिल्या प्रकरणी प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) याच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने कोल्हापूर सत्र न्यायालयाचं निरीक्षण काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.
शिवाय सरकारची बाजू ऐकून योग्य निर्णय घ्यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. याआधी कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून कोरटकरला अंतरिम जामीन मिळाला होता. मात्र, त्यानंतर राज्य सरकारनेही प्रशांत कोरटकरचा अंतरिम जामीन रद्द व्हावा या वरच्या कोर्टात अपील केली होती. या प्रकरणी न्यायालयाने कोरटकर दिलासा दिलेला नाही.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.