Nitin Deshmukh : ‘पैसे कोणाकडूनही घ्या, मतदान मात्र...’; नितीन देशमुखांच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकारणात खळबळ!

Nitin Deshmukh viral speech Maharashtra : ‘पैसे कोणाकडूनही घ्या, मतदान मात्र...’ नितीन देशमुख यांच्या वादग्रस्त वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. नेमकं काय म्हणाले नितीन देशमुख? जाणून घ्या सविस्तर.
Nitin Deshmukh viral speech
Nitin Deshmukh viral speechSarkarnama
Published on: 
Updated on: 

‘‘शिक्षक मतदारसंघात मतदानासाठी कुणाकडूनही पैसे घ्या; मात्र, मतदान आमच्या उमेदवाराला करा,’’ असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी केले.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण येण्याची शक्यता असून, निवडणूक आयोग याची दखल घेऊन काय कारवाई करतो, याकडे लक्ष लागले आहे.

Nitin Deshmukh viral speech
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड पुन्हा टार्गेटवर! घराबाहेर उभे राहून दिली थेट जीवे मारण्याची धमकी

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात यंदा बहुरंगी लढत होत आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार किरण सरनाईक, काँग्रेसकडून प्रा. आदिती पोहरे, तर ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून दत्तात्रय लहाने निवडणूक रिंगणात आहेत. याशिवाय शिंदे गटाचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे, भाजपच्या संगीता शिंदे आणि शेखर भोयर यांच्या भूमिकेमुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार देशमुख यांनी शिक्षक मतदारांना उद्देशून केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या काळात मतदारांना पैशांचे आमिष दाखविणे किंवा पैशांच्या बदल्यात मतदान करण्याचे आवाहन करणे, हा गंभीर विषय मानला जातो. त्यामुळे देशमुख यांच्या वक्तव्याचा निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने विचार होणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Nitin Deshmukh viral speech
Shiv Sena Dussehra Melava : ठाकरेंचा यंदाचा दसरा मेळावा एका मुद्द्यावर गाजणार; पोस्टरने वाढविली उत्सुकता...

शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. अशा परिस्थितीत आमदार देशमुख यांच्या विधानाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल घेतली जाते का आणि त्यावर काही कारवाई होते का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com