Nitin Gadkari Threat Case: नितीन गडकरी धमकी प्रकरणाचे दहशतवादी कनेक्शन; जयेश पुजारीचा पुन्हा धक्कादायक खुलासा

Jayesh Pujari news |बेळगावच्या तुरुंगातून नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात दोनवेळा धमकीचे फोन आले होते.
Nitin Gadkari - Jayesh Pujari
Nitin Gadkari - Jayesh PujariSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nitin Gadkari Threat Case: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आलेल्या धमकी प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. आता या प्रकरणात थेट दहशतवादाचे कनेक्शन समोर आले आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना धमकी दिल्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी जयेश पुजारीला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी जयेश पुजारीने धक्कादायक खुलासे केले आहेत. (Nitin Gadkari threat case terrorist connection; Another shocking revelation of Jayesh Pujari)

बेळगाव तुरुंगात असलेला दहशतवादी संघटनेचा अकबर पाशा याच्या सांगण्यानुसार आपण नितीन गडकरी यांना धमकी दिल्याचे पुजारीने सांगितले आहे. त्याच्या या खुलाशानंतर बेळगाव तुरुंगातून दहशतवादाचं मोठ जाळचं काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. पाशा हा प्रतिबंधित पीएफआय या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. या प्रकऱणीआता नागपूर पोलीस अकबर पाशा याच्यासह त्याच्या तीन साथीदारांचीही चौकशी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अखबर पाशा सह कॅप्टन नसीर, फहद कोया रशीद मालाबारी त्याच्यासह इतर दहशतवादी साथीदारांची चौकशी करण्यासाठी नागपूर पोलीस पुन्हा एकदा बेळगावला जाणार आहे. (Nitin Gadkari News Update)

Nitin Gadkari - Jayesh Pujari
Operation Lotus in Maharashtra : महाराष्ट्रात भाजप खासदारांची संख्या घटणार : तावडे समितीच्या अहवालानंतर राज्यात ‘ऑपरेशन लोटस’

बेळगावच्या तुरुंगातून नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात दोनवेळा धमकीचे फोन आले होते. नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडे १० कोटींच्या खंडणीचीही मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी केलेल्या तपासात बेळगावच्या तुरुंगात हे फोन आल्याचे निदर्शनास आले. नागपूर पोलिसांनी जयेश पुजारीला बेळगावच्या तुरुंगातून ताब्यात घेत त्याची चौकशी केली. यात तो देशविघातक कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या अनेकांशी तो संपर्कात होता.

Nitin Gadkari - Jayesh Pujari
Maharashtra Politics : अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं...

धक्कादायक बाब म्हणजे बेळगावच्या तुरुंगात जाण्याच्या आधीपासूनच त्याचे देश विघातक कामांमध्ये सक्रिय असणाऱ्या लोकांशी तो संपर्का होता, अशी माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या प्रतिबंधित संघटनेसह जयेश लष्कर-ए-तोयबा आणि दाऊद इब्राहिमशी संबंधित लोकांशी संपर्कात असल्याचे पुरावे मिळाल्याची माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली. या प्रकरणाचे धागे दोरे देशाच्या पलीकडेही असल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस केंद्रीय तपास यंत्रणांसह या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.