Rahul Solapurkar : राहुल सोलापूरकर हाजिर हो... अनुसूचित जाती जमाती आयोगाचा इशारा

Pune actor Rahul Solapurkar Mumbai Maharashtra State Scheduled Caste and Scheduled Tribes Commission Babasaheb Ambedkar : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याची गंभीर दखल महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने घेतली आहे.
Rahul Solapurkar
Rahul SolapurkarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी उलटसुलट वक्तव्य करून लेखक, दिग्दर्शक व कलाकार राहुल सोलापूरकर यांनी सर्वांचा रोष ओढावून घेतला आहे.

बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या त्यांच्या वक्तव्याची गंभीर दखल महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने घेतली आहे. त्यांनी केलेल्या विधानाच्या संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. बाबासाहेबांच्या ब्राह्मण असण्याबाबत संदर्भ, पुरावे आयोगापुढे सादर करावे, अन्यथा पुढील कारवाईला सामोरे जावे, असा सज्जड इशारा राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने दिला आहे.

राहुल सोलापूरकर यांनी वेदांचा संदर्भ देत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) हे ब्राम्हण असल्याबाबत केलेल्या वक्तव्याचे वृत्तवर्तमानपत्र आणि दूरचित्रवाहिन्यांवर प्रकाशित आणि प्रसारित झाले. तशा पद्धतीच्या मौखिक आणि दूरध्वनीद्वारे तक्रारी अनुसूचित जाती जमाती आयोगाला प्राप्त झाल्या.

Rahul Solapurkar
Suresh Dhas : आमदार धस यांच्या अडचणी वाढल्या; सूर्यवंशी मृत्यूप्रकरणातील विधान भोवणार

याबाबत सोलापूरकर यांना आयोगाने नोटीस बजावून विचारणा केलेली आहे की, त्यांनी दिलेले संदर्भ त्यांनी दिलेल्या संदर्भांच्या पुष्ठ्यर्थ काही पुरावे, लिखाण असल्यास ते आयोगाच्या पुढे करावे. सोलापूरकर यांनी तसे वक्तव्य करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे आणि या देशातील (India) दलित, शोषित, वंचितांच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यांनी या संदर्भात तत्काळ खुलासा करावा, अशा सूचना राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी  केल्या आहेत.

Rahul Solapurkar
Sanjay Raut On Anna Hazare : मोदी, शिंदे-फडणवीस सरकारचा भ्रष्टाचार, अण्णा हजारेंनी साधी 'कूस'ही बदलली नाही; खासदार राऊतांची टोलेबाजी

सोलापूरकर यांनी छत्रपतींनी लाच देऊन औरंगजेबाच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली होती असे वक्तव्य केले होते. त्यामुळे मराठा समाजामध्ये चांगलाच असंतोष उफाळून आला होता. अनेकांनी सोलपूरकरांना जोड्याने बडवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर सोलापूरकर यांनी जाहीर माफी मागतिली होती. हे प्रकरण शांत होईल असे दिसत असताना त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे ब्राम्हण होते, असे वक्तव्य करून पुन्हा वादाला तोंड फोडले. त्यामुळे आंबेडकरी जनतेत प्रचंड संताप निर्माण झाला आहे.

काहींनी सोलापूरकर यांचे थोबाड फोडणाऱ्यांना बक्षीससुद्धा जाहीर केले आहे. आंबेडकरी जनतेत निर्माण झालेल्या रोषाची दखल अनुसूचित जाती जामाती आयोगाने घेतली आहे. त्यावर आता राहुल सोलापूरकर काय खुलासा करतात आणि आयोगाकडे आपले म्हणणे काय मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com