
Nagpur, 08 February : दिल्लीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. आम आदमी पार्टीची सत्ता गेली असून भाजपने सुमारे 27 वर्षांनंतर दिल्लीवर भगवा फडकावला आहे. त्यामुळे आपचे काय चुकले, यावर वेगवेगळे तर्कवितर्क मांडले जात आहेत. ईव्हीएमवर खापर फोडत आहेत. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपच्या पराभवाचे मुख्य कारण सांगितले आहे. केजरीवालांनी दारूला हात लावल्याने आपचा घात झाला, असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.
अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या कार्यकाळात दिल्लीतील मद्य घोटाळा चांगलाच गाजला होता. याच प्रकरणामुळे केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आपच्या अनेक मंत्र्यांना जेलची वारी करावी लागली होती. हा मद्य घोटाळा दिल्लीकरांच्या पचनी पडला नाही. त्यांनी आम आदमी पार्टीला सत्तेवरून खाली खेचल्याचा दावा मुनगंटीवार यांनी केला आहे.
मुनगंटीवार म्हणाले, गेले दहा वर्षे ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये केजरीवालांनी सरकार चालवण्याचा प्रयत्न केला, तो निश्चितपणे दिल्लीच्या विकासामध्ये एक बाधा ठरणारा होता. तेलंगणा, आंध्र आणि नंतर दिल्लीत हे मतदारांनी सांगितलं आहे की देशाच्या प्रगतीचा संकल्प करणारा, इकॉनॉमिच्या निश्चय करणारा असा पक्ष निश्चित विजय झाला पाहिजे. आपच्या (AAp) पराभवामुळे आता देशाची राजधानी दिल्ली ही प्रगतीपथावर जाईल.
केजरीवाल यांनी असत्याचा सत्य करण्याचा प्रयत्न केला. मतदारांनी त्यांना काय द्यायचा, तो संदेश निवडणुकीतून दिल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. भाजपने दिल्ली जिंकली. बिहारवरच्या निवडणुकीवर याचा परिणाम होईल. बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात नितीश कुमार आणि भाजप पुन्हा निवडून येतील असेही भाकीत मुनगंटीवार यांनी वर्तविले.
पराभव झाल्यानंतर आम आदमी पार्टी असो वा काँग्रेसला कोणावर तरी खापर फोडावे लागणार आहे. ईव्हीएम हे सर्वांसाठी सोयीचे खापर आहे. एक नापास होणारा विद्यार्थी दाखवा जो म्हणतो की मी बुद्धिमान नाही म्हणून नापास झालो अस सांगणारा. कर्नाटक, झारखंड जिंकले तेव्हा त्यात काँग्रसला काहीच गैर वाटले नाही. महाराष्ट्र पराभूत झाल्यावर इतक्या गोष्टी कशा काय सूचतात, असा टोलाही त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांना लागावला. काँग्रेसचे पानिपत झाले असे मी म्हणणार नाही. मात्र, ज्याचे जसे कर्म तसेच फळ त्याला मिळत असते, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.