Shivrajsinh Chouhan News : भावाची गॅरंटी नाही, म्हणून बहीण लाडकी; शिवराजसिंह चव्हाणांनी दिले स्पष्टीकरण

Political News : मध्य प्रदेशमध्ये 50 लाख बहिणी या योजनेचा लाभ घेत आहेत. गरीब बहिणींसाठी दर महिन्याला पैसे टाकण्याचा निर्णय घेतला तेव्हा काँग्रेसच्या लोकांनी विरोध केला. पण आम्ही न्याय दिला असल्याचे शिवराजसिंह चव्हाण यांनी सांगितले.
Shivrajsinh Chouhan, Devendra Fadanvis
Shivrajsinh Chouhan, Devendra Fadanvis Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीची लाडकी बहीण तर महाविकास आघाडीच्या महालक्ष्मी योजनेची सर्वाधिक चर्चा आहे. दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यात या योजनेचा आवर्जुन उल्लेख करण्यात आला आहे. सर्वकाही बहिणीला देतात, भाऊ लाडका नाही का असाही प्रश्नही विचारला जात आहे. यावर मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री तसेच केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह यांनी आम्ही बहिणीला का पैसे देतो ? याची माहिती दिली. ते म्हणाले, भाऊ पैसे कुठे खर्च करतील याची गॅरंटी देता येत नाही. बहिणी मात्र पैशाचा दुरुपयोग करत नाहीत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारासाठी शिवराजसिंह चव्हाण (Shivrajsinh Chouhan) नागपूरला आले आहेत. ते म्हणाले मी महाराष्ट्राचा जावाई आहे आणि सर्वांचा मामासुद्धा. लाडकी बहीण योजनेची सुरुवात मध्य प्रदेशातून झाली. आज मध्य प्रदेशमध्ये 50 लाख बहिणी या योजनेचा लाभ घेत आहेत. गरीब बहिणींसाठी दर महिन्याला पैसे टाकण्याचा निर्णय घेतला तेव्हा काँग्रेसच्या लोकांनी विरोध केला. पण आम्ही न्याय दिला. या योजनेमुळे घरात महिलांचा सन्मान वाढला. लाडली बहीण योजनेमुळे अनेक महिलांचे आयुष्य बदलले. (Shivrajsinh Chouhan News)

Shivrajsinh Chouhan, Devendra Fadanvis
Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी 'गोल्डन गॅंग'च्या उमेदवाराचा करेक्ट कार्यक्रम केला?

आता आम्ही 2100 रुपये महिलांना देणार आहोत. त्यामुळे काँग्रेसला (Congress) नाईलाजाने तीन हजार रुपये देण्याची घोषणा करावी लागली. लाडकी बहीण योजना निवडणूक योजना नाही तर मुलगा व मुलगी यातील जनन्मदर घसरत होता, यासाठी महिला सशक्तीकरण योजना आणण्यात आली. मुलगी जन्माला येताच लखपती असली पाहिजे यासाठी लाडली लक्ष्मी योजना आणली असल्याचे शिवराजसिंह चव्हाण यांनी सांगितले

Shivrajsinh Chouhan, Devendra Fadanvis
Rahul Gandhi Politics: बालेकिल्ल्यात राहुल गांधी गरजले, मोदींना आव्हान देत आदिवासींना जिंकले!

देवेंद्र फडणवीस आगळं- वेगळं व्यक्तिमत्त्व आहे. महाराष्ट्राचा जनतेच्या कल्याणासाठी काम करत आहे. सत्ता परिवर्तन झाले तेव्हा ते मुख्यमंत्री होतील असे वाटत होते, पण त्यांनी मोठेपणा दाखवत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. नागपुरात एक लाख कोटींपेक्षा जास्त रकमेची कामे केली.

Shivrajsinh Chouhan, Devendra Fadanvis
Sanjay Raut: शरद पवारांबाबत माझ्याएवढं कुणालाही माहीत नाही! फडणवीसांना खोटं बोलण्याचा आजार झालाय...

देवेंद्र फडणवीस हे हिरा आहेत, ते उद्याचा भारताचे भविष्य आहे. नागपूरच्या भूमीने गडकरी आणि फडणवीस हे दोन हिरे दिले आहेत. नागपूरच्या विकासामुळे काही जणांची जळफळाट होत आहे. फडणवीस यांचा विजय असा होवो की देशभरात त्याची चर्चा झाली पाहिजे, असेही आवाहन शिवराजसिंह चव्हाण यांनी केले.

Shivrajsinh Chouhan, Devendra Fadanvis
Maharashtra Assembley Election : महाविकास आघाडीला मोठा दिलासा तर महायुतीसाठी धोक्याची घंटा; आणखी एक सर्व्हे आला समोर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com