

Nagpur News : हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आमचे कोणी ऐकत नाही, अधिकारी पत्राला उत्तर देत नाही, मंत्र्यांना निवेदन दिले तर त्याचे काय झाले कोणी कळवत नाही अशी खंत आज विधान परिषदेत आमदारांनी व्यक्त केली. सोबतच लोकसभेप्रमाणे लोकप्रतिनिधींना 15 दिवसांच्या आत उत्तर देण्याचा कायदा करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनीही याची गंभीर दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून आमदारांसाठी काही तर करा अशी सूचना केली.
एकनाथ शिंदे शिवसेनेचे विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने यांनी आमदारांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. विशेष म्हणजे शिंदे सेना महायुतीचा भाग आहे. सत्तेत असलेल्या पक्षाच्या आमदारांच्या पत्राची अधिकारी दखल घेत नाही, जिल्हाधिकारी पत्रावर साधे उत्तरही देत नाही. आमदार म्हणून आम्ही मंत्र्यांनाही पत्र देतो. पुढे त्याचे काम होते हे कळतच नाही.
विशेष म्हणजे कृपाल तुमाने (Krupal Tumane) हे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे 10 वर्षे खासदार होते. त्यांना लोकसभेच्या कामकाजाचा अनुभव आहे. देशभरातील खासदार सभागृहात बसतात. एखाद्या खासदाराने पत्र दिले किंवा प्रश्न उपस्थित केला तर त्यांना 15 दिवसांच्या आत त्यावर काय झाले हे कळवले जाते.
आम्ही आमदार म्हणून लोकांचे प्रश्न, समस्या व मागण्या प्रशासनापर्यंत पोहचवतो. मंत्र्यांकडे आपल्या मतदारसंघातील कामाची विचारणा करतो. काही योजना आपल्या मतदारसंघात राबवायच्या असल्याचे निवेदन देतो. मात्र, त्याची दखलही घेतल्या जात नाही. किमान सुचवलेले काम होणार की नाही हे कळवल्यासुद्धा जात नाही,असंही आमदार कृपाल तुमाने यांनी म्हटलं.
एकीकडे आम्हाला राज्य शासनाच्या योजना जनतेपर्यंत, तळागाळातील लोकांपर्यंत पोचवण्याचे आवाहन केले जाते. निवडणुकीच्या प्रचारात आमच्या सरकारने काय काय केले हे आम्ही प्रचारात सांगतो. मात्र, आमच्याच मागण्यांकडे अधिकारी व मंत्रालयात बसणारे अधिकारी लक्ष देत नसल्याची खंत आमदार कृपाल तुमाने यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.