Nitin Gadkari News: नितीन गडकरींना पुन्हा धमकी; नागपूरच्या कार्यालयात फोन करणारा तो कोण?

Threat Call to Nitin Gadkari: या पूर्वीही नितीन गडकरींना धमकीचे फोन आले आहेत.
Nitin Gadkari
Nitin Gadkari Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात फोन करुन त्यांना धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याने जयेश पुजारी असे नाव सांगितलं आहे. (Threatening call to Nitin Gadkari again)

आज (२१ मार्च) सकाळी दोन वेळा गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयातील लँडलाईन क्रमांकावर हे धमकीचे कॉल आले. या कॉलवरून गडकरींकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची माहिती आहे. या कॉलप्रकरणी त्यांच्या कार्यालयाने नागपूर पोलीसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी गडकरींच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

Nitin Gadkari
Uddhav Thackeray News: शिवसेनेने दादा भुसे यांची मतदारसंघातच केली नाकेबंदी!

जयेश पुजारीने नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना या पुर्वीही नागपूरच्या कार्यालयात फोन करुन धमकी दिली होती. खरतंर तो हत्येच्या प्रकरणात बेळगाव तुरुंगात शिक्षा भोगत आहे. शिवाय त्यानं जेलमधूनच अशा पद्धतीनं अनेकवेळा या अगोदरही मोठे अधिकारी आणि इतरांना धमकीचे कॉल केल्याची माहिती आहे. यापूर्वी 2016 मध्ये तो जेल तोडून पळून गेला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com