Nagpur Violence Report: नागपूरमधील कट पूर्वनियोजित? मुस्लिम समाजकंटकांमुळे दंगा उसळला, तथ्य संशोधन समितीचा अहवाल आला समोर

Key conclusions of the Nagpur violence investigation committee: नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून मार्च महिन्यात मोठा दंगा उसळला होता. येथील महालपरिसरात दगडफेक आणि गाड्यांची जाळपोळ करण्यात आली होती.
Summary of the Nagpur communal violence report findings
Summary of the Nagpur communal violence report findingsSarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. मार्च महिन्यात औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूर महाल परिसरात मोठी दंगल उसळली होती.

  2. या दंग्यात फिहम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल असून शेकडो लोकांवर गुन्हे नोंदवले गेले.

  3. भारतीय विचार मंचच्या सत्यशोधन समितीने सादर केलेल्या अहवालात हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचा निष्कर्ष काढला आहे.

Nagpur Communal Violence: मार्च महिन्यात औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये मोठा दंगा उसळला होता. महालपरिसरात मोठ्य प्रमाणात दगडफेक आणि गाड्यांची जाळपोळ करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी शेकडो लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. मुख्य आरोपी फिहम खान याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे.

हा दंगा नेमक्या कुठल्या कारणामुळे, कोणामुळे घडला याचा शोध घेण्यासाठी भारतीय विचार मंचने स्थापन केलेल्या सत्य शोधन समितीचा अहवाल मंगळवारी सार्वजनिक करण्यात आला. यात काही मुस्लिम समाजकंटकांमुळे हिंसाचाराची घटना घडली असून सर्वकाही पूर्वनियोजित होते असा दावा करण्यात आला आहे.

समितीने हिंसाचाराच्या दुसऱ्या दिवसापासूनच कामाला सुरुवात केली होती. सुमारे 40 हिंदू पीडित आणि 20 ते 22 मुस्लिम समाजबांधवांच्या भेटी घेतल्या. दंगलीबाबतची त्यांची मते जाणून घेतली. मुस्लिम बांधवांनी त्यांची नावे उघड न करण्याच्या अटीवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. दोन्ही समुदायांनी सुचविलेल्या उपाययोजनांची नोंद तथ्य संशोधन समितीने घेतली.

Summary of the Nagpur communal violence report findings
Nagpur Violence : नागपूर राडा प्रकरण: मुंबई हायकोर्टाच्या निकालानंतर तब्बल 80 जणांना एकाच दिवशी जामीन

सुमारे 10 विविध संघटनांनी तथ्य संशोधन समितीकडे निवेदने देऊन आपली भूमिका स्पष्ट केली. सत्यशोधन समितीतील निवृत्त न्यायाधीश सोपान देशपांडे, भारतीय विचार मंच, युवा आयाम प्रमुख अ‍ॅड. भाग्यश्री दिवाण, ज्येष्ठ पत्रकार चारुदत्त कहू, रमाकांत दाणी, सामाजिक कार्यकर्ते सुनील किटकरू, सुरेश विंचूरकर, विश्वजित सिंग, राजू साळवे, राहुल पानट आणि भारतीय विचार मंचच्या अ‍ॅड. रितू घाटे यांचा समावेश होता.

समितीचे निष्कर्ष

कबरीची प्रतिकृती आणि हिरव्या कापडाची जाळपोळ हे केवळ एक क्षणिक निमित्त होते. दंगलीस इतरही गोष्टी कारणीभूत होत्या. देशात मागील काही काळात घडलेल्या घटनाक्रमावर मुस्लिम समाजात पसरविण्यात आलेले गैरसमज मोठ्या प्रमाणात या घटनेला हातभार लावून गेल्याचे समितीला आढळून आले.

हिंदू समाजाला लक्ष्य करण्यासाठी हा दंगा करण्यात आला. कायद्याचे राज्य उद्ध्वस्त करणे, पोलिस तसेच नागरिकांमध्ये भीती निर्माण करणे आणि पोलिसांना हतबल करण्याचा जमावाचा हेतू होता. दंगलग्रस्त वस्त्यांमधील अनेक घरांमध्ये महिला एकट्याच होत्या. अशावेळी घरांवर दगडफेक करून घरांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न झाला. इस्लामच्या नावे घोषणाबाजी करून महिलांमध्ये पद्धतशीर दहशत पसरविण्याचा कट यामागे होता.

Summary of the Nagpur communal violence report findings
Nagpur Violence: नागपूर दंगलीतील देशद्रोहाचा आरोप असलेल्या हमीद इंजिनिअरला जामीन मंजूर

हिंसक जमावाने ‘टारगेटेड’ हल्ले केले. हिंसक जमावाने मोठ्या प्रमाणात लोकांवर, दुकानांवर, घरांवर, रस्त्यावर उभ्या वाहनांवर दगडफेक सुरू केली. वाहनांची मोठ्या संख्येने जाळपोळ केली. त्यामुळे हिंदू समुदायातील नागरिकांच्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पोलिसांना अल्पसंख्य मुस्लिम समाजाच्या संवेदनशील वस्त्यांमधील घडामोडींची पुरेशी कल्पना आली नाही. पोलिसांना दंगल हाताळण्यात संपूर्ण सज्जता बाळगता आली नाही.

पोलिसांना जमाव एकत्र येत असल्याची कल्पना आली, त्यावेळी तो जमू न देण्याच्या तात्काळ उपाययोजना झाल्या नाहीत. काही मशिदींमध्ये नेहमीपेक्षा बरेच जास्त लोक विशेषतः तरुण आणि अल्पवयीन मुले जमली असल्याचे लक्षात आले.

हिंसक जमाव हाताळण्यासाठी तसेच त्यापासून बचावासाठी सुरुवातीला पोलिस यंत्रणेकडे पुरेशा प्रमाणात साधनसामग्री उपलब्ध नव्हती. उदाहरणार्थ, शील्ड, हेल्मेट. अनेक नागरिकांनी पोलिसांना आपल्याकडील साधी हेल्मेट पुरविल्याची उदाहरणे समितीला आढळून आली.

संकटग्रस्त वस्त्यांमधील नागरिकांकडून पोलिस नियंत्रण कक्ष, पोलिस ठाणे आणि पोलिस अधिकाऱ्यांना मदतीसाठी मोठ्या प्रमाणात फोन येत होत. विशेषतः गवळीपुरा, शिर्के गल्ली, हंसापुरी व इतर ठिकाणांवरून मोठ्या प्रमाणात पोलिसांना फोन आले होते. पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.

Summary of the Nagpur communal violence report findings
Nagpur violence : दंगलीत फक्त मुस्लिम समाज टार्गेट..., नागपूरमध्येच काँग्रेस नेत्याचे फडणवीसांवर गंभीर आरोप

FAQs :

1. नागपूर दंगल का उसळली होती?
औरंगजेबाच्या कबरीच्या संदर्भात निर्माण झालेल्या वादातून महाल परिसरात दंगल उसळली होती.

2. फिहम खान कोण आहे आणि त्याच्यावर कोणता गुन्हा आहे?
फिहम खान हा दंग्याचा मुख्य आरोपी असून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3. सत्यशोधन समितीच्या अहवालात काय निष्कर्ष आहेत?
या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, हिंसाचार पूर्वनियोजित होता आणि काही मुस्लिम समाजकंटक यामागे होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com