Devendra Fadnavis : लोकसभेतील पराभवानंतर राजू पारवे विधानसभेच्या रिंगणातूनही बाहेर; फडणवीसांनी दिला शब्द...

Umred Assembly Constituency: राजू पारवे यांची अवस्था ना घर का ना घाट का झाली होती. त्यांची बंडखोरी भाजपसाठी महागडीसुद्धा ठरली असती.
Devendra Fadnavis, Raju Parve
Devendra Fadnavis, Raju ParveSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Election : उमरेड विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या बंडखोरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी बोलून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले.

भाजपच्या आग्रहाखातर पारवे यांनी काँग्रेस सोडली आणि शिवसेनेत प्रवेश केला होता. लोकसभेत पराभूत झाल्यानंतर भाजपने त्यांना उमेदवारी देण्यास नकार दिला. शिंदे सेनेनेही त्यांच्यासाठी आग्रह धरला नाही. त्यामुळे पारवे माघार घेणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. फडणवीस यांनी खंडित झालेली राजकीय कारकीर्द सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पारवेंनी माघार घेतली.

Devendra Fadnavis, Raju Parve
Jalna Assembly Constituency : जालन्यात अर्जुन खोतकरांविरोधात भाजपची बंडखोरी, पण ..

भाजपचे उमेदवार माजी आमदार सुधीर पारवे यांच्या समोरचा मोठा अडथळा आता दूर झाला आहे. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे राजू पारवे विरुद्ध भाजपचे सुधीर पारवे असा सामना झाला होता. तो राजू पारवे यांनी जिंकला होता. मात्र त्यांना लोकसभा निवडणुकीचे वेध लागले. भाजपला त्यांना लोकसभेचा उमेदवार करायचे होते. मात्र महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता.

मुख्यमंत्री शिंदे यांनी मतदारसंघ सोडण्यास नकार दिला. शेवटपर्यंत वाटाघाटी झाल्या. शेवटी भाजपच्या सांगण्यावरून राजू पारवे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला व त्यांना उमेदवार घोषित केले. त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यानंतरही त्यांना कोणी वाचवू शकले नाही. माजी मंत्री केदारांचे कट्टर समर्थक श्यामकुमार बर्वे येथून निवडून आले. त्यामुळे राजू पारवे यांचा त्रिशंकू झाला होता.

Devendra Fadnavis, Raju Parve
Satara Political News : मराठा समाजाच्या अर्ज माघारीने निवडणूक रिंगणातील नेत्यांची धाकधूक झाली कमी

प्रवेश केल्याने ते शिवसेनेचे अधिकृत सदस्य झाले होते. विधानसभेत त्यांचा उमरेड विधानसभा मतदारसंघ भाजपने सोडण्यास नकार दिला. येथून भाजपचे सुधीर पारवे यापूर्वी तीन वेळा निवडून आले होते. मध्यंतरी त्यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याने स्थानिक नेत्यांना त्यांनी तिकीट कापण्याची हिमंत झाली नाही. त्यामुळे राजू पारवे यांची अवस्था ना घर का ना घाट का झाली होती. त्यांची बंडखोरी भाजपसाठी महागडीसुद्धा ठरली असती.

देवेंद्र फडणवीस यांनीच राजू पारवेंना पुनर्वसनाचा शब्द दिला. पारवे यांची खंडित झालेली राजकीय कारकीर्द पुन्हा सुरू करण्यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यासाठी आपण स्वतः लक्ष घालणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com