Bharat Gogawale : गोगावलेंनी दिलेली डेडलाईन संपली; ना बैठक ना चर्चा, भरतशेठ यांची इच्छा काय पुरी होईना....

Raigad Guardian Minister Dispute : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. ते दिल्लीहून परतल्यानंतर दोन दिवसांत म्हणजे एक फेब्रुवारीनंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेल, असा आशावाद मंत्री गोगावलेंनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला हेाता.
Mahayuti Leader
Mahayuti LeaderSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 03 February : महायुतीमधील पालकमंत्रिपदाचा तिढा काही केल्या सुटायला तयार नाही. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले प्रचंड इच्छुक आहेत. मात्र, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रिपद गेले आहे, त्यामुळे महायुतीमध्ये जोरदार धुसफूस सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्याहून आल्यानंतर पालकमंत्रिपदाचा तिढा दोन दिवसांत सुटेल, असे गोगावले यांनी स्पष्ट केले हेाते. मात्र, गोगावलेंनी दिलेली डेडलाईन संपली, तरी पालकमंत्रिपदाचा तिढा सुटत नसल्याने त्यांची इच्छा अपूर्णच राहिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दाओस दौऱ्यावर असताना रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली होती. दाओसहून परतल्यानंतर मुख्यमंत्री हे केंद्रीय कमिट्यांच्या कामानिमित्त दिल्लीला गेले होते. फडणवीस दिल्लीहून परतल्यानंतर दोन दिवसांत रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेल, असे रोजगार हमी योजना मंत्री भरग गोगावले यांनी सांगितले होते. भरत गोगावलेंनी सांगितलेली २ दिवसाची मुदत संपली तरीही पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे.

पालकमंत्रिपदाचा तिढा सुटावा, यासाठी रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे तीनही आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale), महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनात गेले होते. मात्र, भेटीच्या ऐनवेळी अजित पवार हे जेवायला गेले होते, त्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री भरत गोगावले यांनी येत्या दोन दिवसांत रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत सकारात्मक निर्णय होईल, असं सांगितलं होतं.

Mahayuti Leader
Mohol Politic's : मोहोळच्या माजी नगराध्यक्षाने लोकसभेपासून तिसऱ्यांदा भूमिका बदलली!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. ते दिल्लीहून परतल्यानंतर दोन दिवसांत म्हणजे एक फेब्रुवारीनंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाचा (Raigad Guardian Minister) तिढा सुटेल, असा आशावाद मंत्री गोगावलेंनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला हेाता. मात्र, रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत अद्याप कोणताही तोडगा अथवा चर्चा झाली नसल्याचे पुढे आले आहे.

Mahayuti Leader
Maharashtra Politic's : 'अमित शाहांनी शब्द पाळला नाही, अपमानित केले, फसवणूक झाल्याची एकनाथ शिंदेंची भावना'

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावरुन परत आले आहेत. मात्र; अजुनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत कोणतीही बैठक झालेली नाही, त्यामुळे महायुतीतील रायगड आणि नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्रिपदाचा तिढा अधिकच क्लिष्ठ होतोय का, अशी चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com