Vidhan Parishad Elections: विधान परिषदेसाठी भाजपात मोर्चे बांधणी, राम सातपुते, केशव उपाध्ये यांच्यासह 'या' नावांची चर्चा

Ram Satpute Ranjitsinh Nimbalkar: विधान परिषदेच्या पाच जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत. या जागांसाठी पक्षातील नेत्यांकडून मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे.
Keshav Upadhye 
 Ram Satpute Ranjitsinh Nimbalkar
Keshav Upadhye Ram Satpute Ranjitsinh Nimbalkar sarkarnama
Published on
Updated on

Vidhan Parishad elections Maharashtra BJP candidates: विधान परिषदेच्या 9 जागांसाठी मे महिन्यात निवडणूक होणार आहे. भाजपच्या वाट्याला सर्वाधिक पाच जागा येणार आहेत. त्यामुळे राज्यसभेसाठी संधी हुकलेल्या नेत्यांकडून मोर्चे बांधणी करत विधान परिषदेला संधी मिळावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, पक्षात उमेदवारीसाठी काही नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत.

राम सातपुते यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत मोहित पाटलांचे वर्चस्व मोडून काढले. त्यांच्या पत्नी विजयी झाल्या. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा विधान परिषदेसाठी सुरू असल्याची माहिती आहे. मात्र, रणजितसिंह मोहिते पाटील हे देखील पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत भाजप काय निर्णय घेणार हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

राम सातपुते यांच्यासोबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्या देखील नावाची चर्चा आहे. भाजपची बाजु माध्यमांमधून भांडणाऱ्या केशव उपाध्ये यांच्यावर नेहमीच अन्याय होत असल्याची चर्चा असते. त्यांच्या मागून आलेल्या लोकांना विधीमंडळामध्ये जाण्याची संधी मिळाली मात्र ते अजुनही प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे त्यांचे देखील नाव चर्चेत आहे.

Keshav Upadhye 
 Ram Satpute Ranjitsinh Nimbalkar
Rishikesh Vaidya Case : भोंदू वैद्य बाबाची विकृत मानसिकता उघड; महिलेला अश्लील फोटो अन् व्हिडिओ पाठवल्याचे स्क्रीनशॉट आले समोर...

फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकराचे वर्चस्व कमी करण्यात माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना यश आले आहे. जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी चांगली कामगिरी केली. त्या कामगिरीचे बक्षीस म्हणून त्यांना विधान परिषद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्यांचे नाव देखील विधान परिषदेसाठी चर्चेत आहे.

भाजपचे धक्कातंत्र

रणजीत सिंह निंबाळकर, केशव उपाध्ये, राम सातपुते, माधवी नाईक यांच्या नावे चर्चे असताना नव्या चेहऱ्यांना देखील संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपने धक्कातंत्र देत नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. त्या प्रमाणे पक्ष संघटनेत काम करणाऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

Keshav Upadhye 
 Ram Satpute Ranjitsinh Nimbalkar
Pune ZP : पुणे झेडपीतील सत्तेचा वाट ठरला; सभापती निवडीत भोर, मावळचा पत्ता कट? बारामती, इंदापूर, पुरंदरला ठेंगा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com