Walmik Karad case: ऐनवेळी कराडची सुनावणी केजवरुन बीडला का हलवली ? मोठं कारण आलं समोर...

Santosh Deshmukh murder case : बीड कोर्टाने कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, केजऐवजी बीड कोर्टात या प्रकरणाची सुनावणी घेण्याचे मोठे कारण पुढे आले आहे.
Walmik Karad 4
Walmik Karad 4Sarkarnama
Published on
Updated on

Kej to Beed hearing News : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वेगाने घडामोडी घडत आहेत. खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मीक कराडची पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मात्र, त्याच्यावर मोक्का लावण्यात आला. यानंतर त्याला बुधवारी दुपारी पुन्हा केज सत्र न्यायालयात हजर केले जाणार होते. पण त्याऐवजी बीड जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी बीड कोर्टाने कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, केजऐवजी बीड कोर्टात या प्रकरणाची सुनावणी घेण्याचे मोठे कारण पुढे आले आहे.

वाल्मीक कराडवर मोक्का लावल्यानंतर परळीसह बीड जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे. कराडचे समर्थक आक्रमक झाले असून आंदोलन करत आहेत. कराडच्या पांगरी गावात एक समर्थक टॉवरवर चढला असून कराडवर दाखल केलेले गुन्हे खोटे असून ते मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे म्हटले होते.

Walmik Karad 4
Walmik Karad Wife Statement : निवडून यायला मोठं व्हायला अण्णा पाहिजे, आता अण्णाला पायाखाली घालून तुम्हाला वर चढायचे का?

त्यातच बुधवारी सकाळी मकोका अंतर्गत वाल्मिक कराड यांच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण करुन त्याला बीड जिल्हा न्यायालयात (Beed Court) हजर केले जाणार आहे. वाल्मिक कराडला सुनावणीसाठी केज न्यायालयात आणण्यात येणार होते. मात्र, ऐनवेळी ही सुनावणी बीड जिल्हा न्यायालयात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षेच्या कारणास्तव सीआयडीकडून न्यायालयाकडे केलेला अर्ज स्वीकारण्यात आला. त्यानंतर बीड जिल्हा न्यायालयाबाहेर सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली होती.

Walmik Karad 4
Walmik Karad Video : पोलिस व्हॅनमध्ये बसताना वाल्मिक कराडने आवाज दिलेला रोहित कोण?

कराडच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर केज न्यायालयासह बीड जिल्हा न्यायलायबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. केज न्यायालयाऐवजी बीड जिल्हा न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव केजऐवजी बीड जिल्हा न्यायालयात सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे. यासाठी सीआयडीकडून अर्ज करण्यात आला होता.

Walmik Karad 4
Walmik Karad Custody : मोठी बातमी! वाल्मिक कराड घुले अन् चाटेच्या संपर्कात? देशमुखांना दिली होती धमकी? सात दिवसांची पोलिस कोठडी

दरम्यान, बुधवारी सकाळपासूनच परळी शहरातील अनेक दुकाने बुधवारी उघडली नाहीत. शिरसाळा आणि धर्मापुरी या गावांमध्ये वाल्मिक कराड यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ बंद पाळला जात आहे. मंगळवारी वाल्मीक कराड यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर परळी शहरांमध्ये बाजारपेठ बंद झाली होती. परळी बंद असा कोणताही आव्हान करण्यात आले नव्हते. तरीही परळी शहरातील निम्मी बाजारपेठ आताही बंद असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.

Walmik Karad 4
Walmik Karad : वाल्मिक कराडला फर्ग्युसन जवळ ऑफिस खरेदीसाठी मदत करणारी 'ती' महिला कोण?

दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case) मंगळवारी वाल्मिक कराडला मोक्का लावल्यानंतर बुधवारी दुपारी बीड कोर्टात हजर करण्यात आले. या प्रकरणी कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर कोर्टाने वाल्मिक कराडला सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. संतोष देशमुख यांच्या हत्येदिवशी वाल्मिक कराड यांचे विष्णू चाटे व सुदर्शन घुले यांच्याशी बोलणे झाल्याची माहिती एसआयटीकडून तपास अधिकारी अनिल गुजर यांनी सुनावणीवेळी कोर्टात सादर केली. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणी वाल्मिक कराडला सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

Walmik Karad 4
Supriya Sule : 'देशमुख, राऊत, मलिक यांना ईडी लावता, मग कराडला का नाही?', सुप्रिया सुळे यांचा सवाल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com