Eknath Shinde pressure : कोकाटेंचं खातं बदलताच शिंदेंवर प्रेशर वाढलं : गोगावले, शिरसाट, कदमांवर राहणार मुख्यमंत्र्यांचं लक्ष

Devendra Fadnavis target News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे चार मंत्री, दोन माजी मंत्री व एक आमदार अडचणीत आला आहे. त्यातच दोन दिवसापूर्वीच कॅबिनेट बैठकीत सीएम फडणवीसांच्या टार्गेटवर नेमके कोण होते? याची चर्चा रंगली आहे.
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासूनच सत्ताधारी महायुतीसमोरील अडचणी वाढल्या होत्या. अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच हिंदी सक्तीचा जीआर महायुती सरकारला मागे घ्यावा लागला होता. त्यानंतरही महायुती सरकारसमोरील अडचणी वाढतच गेल्या. अधिवेशन काळातच सत्ताधारी भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री व आमदार अडचणीत सापडले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आक्रमक झाले होते.

त्यातच अजितदादांनी अडचणीत आलेल्या मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांचे खाते बदल करीत मार्ग काढला असला तरी आता येत्या काळात एकनाथ शिंदे या वादातून कसा मार्ग काढणार? याची चर्चा रंगली आहे. कारण की शिवसेनेचे चार मंत्री, दोन माजी मंत्री व एक आमदार अडचणीत आला आहे. त्यातच दोन दिवसापूर्वीच कॅबिनेट बैठकीत सीएम फडणवीसांच्या टार्गेटवर नेमके कोण होते? याची चर्चा रंगली आहे.

महायुतीचे (Mahayuti) सरकार राज्यात येऊन आठ महिन्याचा कालावधी लोटला आहे. त्यानंतरही महायुती सरकारच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाही. सरकार स्थापन होऊन दोन महिने झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनावेळी अंबाजोगाई तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड दोषी आढळल्याने मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर या-ना त्या कारणाने महायुती सरकारसमोरील अडचणी वाढतच राहिल्या आहेत.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
BJP Politics : 'संपूर्ण महाराष्ट्र भोंगे मुक्त करायचा', भाजप नेत्याने कंबर कसली

नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशन काळातच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला केलेली मारहाण, मंत्री संजय शिरसाट यांचे व्हायरल झालेला पैशांच्या बॅगसहचा व्हिडिओ, संजय राठोडचे भ्रष्टचार प्रकरण, शंभूराज देसाईंनी सभागृहात केलेले वादग्रस्त विधान, मंत्री योगेश कदम यांच्या आईचे नावे असलेला डान्स बार, त्याशिवाय माजी मंत्री संदीपान भुमरे यांनी भावजयीच्या नावे घेतलेले दारूच्या दुकानाचे लायसन, त्याशिवाय माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या पंचायत राज दौऱ्यावेळी सापडलेले पैसे यामुळे या सर्वासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Kokate portfolio change: मकरंदआबांचा नकार तर भरणेमामांचा होकार; कोकाटेंचे खाते बदलताना पडद्यामागे काय घडले?

याशिवाय विधिमंडळाच्या आवारातच भाजप आमदार गोपिचंद पडळकर व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांत झालेली मारहाण यासोबतच मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहातच रमी खेळताना व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे चर्चेत आले होते. त्यातच लातूरमध्ये सुनीत तटकरेंच्या दौऱ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे अध्यक्ष नीलेश चव्हाण यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली होती. त्यामुळे कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात यावा, या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले होते.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Kailas Gorantyal Join BJP : '50 खोके एकदम ओके' घोषणेचे जनक कैलास गोरंट्याल भाजपमध्ये, पहिलं टार्गेट जाहीरपणे सांगितलं

या सर्व घटना घडामोडीनंतर अजित पवार यांनी राज्य सरकारची होत असलेली बदनामी टाळण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. विशेषतः त्यासाठी त्यांच्यावर सीएम फडणवीस यांचा दबावही होता. त्यामुळे त्यांनी कोकाटे यांचा राजीनामा घेण्याऐवजी त्यांच्याकडील कृषी खाते दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवले आहे. हे करीत असताना त्यांनी जनतेची नाराजी लक्षात घेऊन खाते बदलाची कारवाई केली.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Mahadev Munde SIT Probe : अखेर मुंडे-कराड यांना नको असलेल्या डॅशिंग अधिकाऱ्याची बीडमध्ये एन्ट्री : महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापन

गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री या ना त्या कारणाने चर्चेत आले आहेत. त्यामुळे या मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकाकांकडून दबाव आणला जात असतानाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याबाबत निर्णय घेताना दिसत नाहीत. उलटपक्षी ते वादग्रस्त मंत्री योगेश कदम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. दुसरीकडे मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट प्रसंगी सीएम देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दांत वादग्रस्त मंत्र्यांची कानउघडणी केली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील दबाव वाढला आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Mahadev Munde Case News : ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटल्या; हत्येची एसआयटी चौकशी होणार अन् आरोपींच्या अटकेचेही आदेश!

एकनाथ शिंदे यांनी नुकताच दिल्ली दौरा केला आहे. त्यानंतर दिल्लीहून परतल्यानंतर शिंदे शांतच दिसत आहेत. सध्या तरी ते कारवाई करण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीत. वादग्रस्त मंत्र्याविरोधात विरोधकाने रान पेटवले असून आक्रमकपणे ते रस्त्यावर उतरले आहेत.

विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भ्रष्ट मंत्र्याबाबतचे पुरावेच सादर करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर फडणवीस यांनी योग्य ते कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे येत्या काळात काय कारवाई केली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
BJP Expansion Strategy: पक्षविस्तार की सत्तेसाठीची तडजोड?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com