farmer suicide Case : हृदयद्रावक घटना, कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याने शेतकऱ्याने जीवन संपवलं; मंत्र्यांनी दिलं मोठं आश्वासन

Dattatray Bharne On Yavatmal Farmer Suicide Case : राज्य सरकारने घोषणा केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मधून कोणीही वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.
Maharashtra Farmers Loan Waiver; Dattatray Bharne
Maharashtra Farmers Loan Waiver; Dattatray Bharnesarkarnama
Published on
Updated on

Yavatmal Farmer End Life : राज्यातील महायुतीच्या सरकारने जाहीर केलेल्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत पहिल्या यादीत ५५३ आणि तिसऱ्या यादीत तब्बल १७ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली. पण या कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याने यवतमाळमध्ये शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले. राळेगाव तालुक्यातील भांब गावात ही हृदयद्रावक घटना घडली असून, बँकेतून घरी आल्यानंतर शेतकऱ्याने विष प्राशन करून आयुष्य संपवले. राजू बापूराव चुड्डुके (४९ वर्षे) असे शेतकऱ्याचे नाव असून, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

फडणवीस सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर आता पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शेतकरी बँकेमध्ये रांगा लावून आपली कर्जमाफी झाली की नाही, हे पाहत आहेत. अशातच कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव न आल्याने यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील भांब गावात शेतकऱ्याने आत्महत्या केली.

४९ वर्षीय चुड्डुके असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून, ते भांब गावामध्ये कुटुंबीयांसोबत राहत होते. दरम्यान, बँकेमध्ये कर्जमाफीच्या यादीमध्ये त्यांचे नाव आहे की नाही, हे पाहण्यासाठी ते गेले होते. मात्र, यादीमध्ये त्यांचे नाव दिसले नाही. या नैराश्यातून ते घरी गेले आणि बँकेतून विष प्राशन करून टोकाचे पाऊल उचलले.

Maharashtra Farmers Loan Waiver; Dattatray Bharne
Farmer Suicide Crisis : महायुती सरकारची कर्जमाफी येण्याआधीच चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; लातूरच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला!

याबाबत मिळालेली माहिती अशी की, राजू चुड्डुके यांच्या नावावर मुधापूर उजाड येथे १ हेक्टर ३९ आर शेती आहे. त्यांच्या नावावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तसेच चार मायक्रो फायनान्स कंपन्यांचे कर्ज असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, कर्जमाफीच्या घोषणेनं ते देखील आनंदी होते.

मात्र, कर्जमाफीच्या यादीत त्यांचे नाव न आल्याने ते मानसिक तणावाखाली होते. दरम्यान, चुड्डुके यांनी नैराश्यातून रात्री १० वाजता विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ राळेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. राजू यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे.

Maharashtra Farmers Loan Waiver; Dattatray Bharne
Dattatray Bharne Targets CJP : कॉक्रोच जनता पार्टी’वर दत्ता भरणेंचा टोला; इंटरनेटवर पक्ष चालवणं आणि प्रत्यक्ष राजकारण वेगळं!

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या घटनेची नोंद पोलिसांनी करून घेत तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेवरून कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी, यवतमाळचे शेतकरी चुड्डुके यांनी आत्महत्या केली. पण त्यांच्यावर ही वेळ का आली, याची तपासणी होईल. ते पात्र असतील, तर नक्की त्यांना मदत केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com