ZP Election Result : जिल्हा परिषदेचा पहिला निकाल हाती, अजितदादांची शिलेदार विजयी; अश्विनी दळवींनी इतिहास घडवला!

ZP Result 2026 NCP Ajit Pawar : पहिला निकाल माढ्यामधून समोर आला आहे. जिल्हा परिषद भोसरे गटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत.
ZP solapur
ZP solapurSarkarnama
Published on
Updated on

Solapur ZP Result : जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होतो आहे. टपाल मतमोजणी पूर्ण झाली असून ईव्हीएमचे आकडे समोर येत आहेत. त्यातच पहिला निकाल माढ्यामधून समोर आला आहे. जिल्हा परिषद भोसरे गटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी दळवी या विजयी झाल्या आहेत.

अजित पवारांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये येत असताना अजित पवारांचे विमान अपघातामध्ये निधन झाले. दरम्यान, या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काही ठिकाणी एकत्र आल्या आहेत.

राज्यातील कलानुसार सुरुवातीच्या टप्प्यात भाजप हा आघाडीवर असल्याचे दिसते आहे. भाजपचे 60 उमदेवार आघाडीवर आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे 30 उमेदवार आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गट देखील 30 जागांसह आघाडीवर दिसतो आहे.

ZP solapur
ZP Election Results 2026 : निकाल जाहीर होण्याआधीच झेडपी आणि पंचायत समितीच्या 'या' 27 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी, पाहा संपूर्ण यादी

कोल्हापूरात काँग्रेसची चांगली सुरुवात

कोल्हापुरातील पहिला निकाल हाती आला असून घुणकी येथे काँग्रेसच्या शुभांगी महेश कुंभार या जिल्हा परिषदसाठी विजयी झाल्या आहेत. तर, पंचायत समिती नवे पारगाव मध्ये काँग्रेसचे भारत विरधवल पाटील विजयी झाले आहेत. तसेच, घुणकी पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या संगीता संग्राम पाठील विजयी झाल्या आहेत.

ZP solapur
BMC Mayor election: ठाकरेसेनेची 'मनसे' खदखद बाहेर; भाजपचे 11 पैकी 10 महापौर, त्यांच्या बगलबच्च्यांचे महापौर काय दिवे लावणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com