BMC Election : फडणवीसांची मिमिक्री रामदास कदमांच्या जिव्हारी! थेट आदित्य ठाकरेंची औकात काढली; म्हणाले, 'त्याच लग्न झालेलं नाही, अनेक गोष्टी पडद्याआड...'

Devendra Fadnavis mimicry Controvercy : "काही लोकांनी काल माझीच नक्कल केली. पण माझी कोणी नक्कल केली तर मला मजा येते. त्यामुळे मला काही अडचण नाही. मात्र, त्यांना समजायला पाहिजे की नक्कल करता-करता काकाच्या पक्षाची काय अवस्था झाली? काकाला किमान चांगली नक्कल तरी करता येते."
Ramdas Kadam, Aaditya Thackeray, Devendra Fadnavis
Ramdas Kadam, Aaditya Thackeray, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 13 Jan : महापालिका निवडणुकांच्या प्रचाराची सांगता आज होणार आहे. मात्र, मागील दोन दिवसांमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मुंबईत ठाकरे बंधुंच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. या सभेत बोलताना ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मिमिक्री केली होती.

आदित्य ठाकरेंनी केलेल्या याच मिमिक्रीमुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम चांगलेच संतापले आहेत. कुणी कुणावर बोलावं आदित्य ठाकरेची औकात आहे का? अशा शब्दात कदमांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. माध्यमांशी बोलताना रामदास कदम म्हणाले, "आदित्य ठाकरेचा आवाज काय बोलणं काय? त्याच अजून लग्न झालेलं नाही.

अनेक गोष्टी पडद्याआड आहेत. कुणी कुणावर बोलावं औकात आहे का त्याची? माझ्यावेळीही असंच केलं ना. उद्धव ठाकरे आदल्या दिवशी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करतो म्हणाले आणि दुसऱ्या दिवशी स्वत: मुख्यमंत्री आणि आदित्य कॅबिनेट मंत्री झाला आणि रामदास कदम आऊट..." रामदास कदमांनी थेट ठाकरेंची औकात काढल्यामुळे आदित्य यांनी फडणवीसांवर केलेली टीका भाजपच्या नेत्यांऐवजी शिंदेंच्या नेत्यांच्याच जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळत आहे.

Ramdas Kadam, Aaditya Thackeray, Devendra Fadnavis
Election Commission : महापालिकेत बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांना मोठा दिलासा! 'कायद्यातच 'बिनविरोध'ची तरतूद असल्याचं निवडणूक आयुक्तांनी केलं स्पष्ट

आदित्य ठाकरेंनी काय केली मिमिक्री?

आदित्य ठाकरे आपल्या भाषणात फडणवीसांची नक्कल करताना म्हणाले, "एकच विषय घेतात. कुठेही गेलं की. आमची मुंबईमध्ये सत्ता येणार. आणि सत्ता आल्यानंतर अध्यक्ष महोदय, मोदी साहेब, आम्ही इथून बांगलादेशींना काढणार, ये जलवा है मेरा, मै आऊंगा..", काय चाललय हो. कशासाठी हे सगळं. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही मुख्यमंत्री सात वर्ष या राज्याचे आहात, हे विसरू नका."

Ramdas Kadam, Aaditya Thackeray, Devendra Fadnavis
Nashik Politics : राष्ट्रवादीच्या 4 उमेदवारांची माघार! अजितदादांच्या सामंजस्यामुळे ऐन निवडणुकीपूर्वी शिंदेंच्या उमेदवारांना मोठा दिलासा

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी देखील आदित्य ठाकरेंनी केलेल्या मिमिक्रीवर प्रतिक्रिया दिली. "काही लोकांनी काल माझीच नक्कल केली. पण माझी कोणी नक्कल केली तर मला मजा येते. त्यामुळे मला काही अडचण नाही. मात्र, त्यांना समजायला पाहिजे की नक्कल करता-करता काकाच्या पक्षाची काय अवस्था झाली? काकाला किमान चांगली नक्कल तरी करता येते, चांगलं भाषण करता येतं. पण तुम्हाला ते पण येत नाही. तुमची काय अवस्था होईल? हे एकदा मागे वळून पाहा", असं म्हणत फडणवीसांनी आदित्य यांना टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com