

Mumbai, 06 March : राज्याच्या अर्थसंकल्पात दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी अभिनंदन केले आहे. ते अभिनंदन करताना राज्य सरकारने दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांचा या कर्जमाफीत विचार करण्यात आलेला नाही, असा दावाही डॉ नवले यांनी केला आहे. त्यामुळे कर्जमाफीबाबत उलटसुटल चर्चांना जोर चढला आहे.
डॉ. नवले म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीची (loan waiver) घोषणा केली, याबद्दल किसान सभेच्या वतीने आम्ही स्वागत करतो. कारण कर्जमाफी करू; पण तारीख सांगणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारची होती. मात्र विदर्भात माजी आमदार बच्चू कडू, माजी खासदार राजू शेट्टी आणि आम्ही सर्वांनी जे आंदोलन केले, त्या पार्श्वभूमीवर ३० जून २०२६ च्या आतमध्ये कर्जमाफी करू, असं सरकारला सांगावं लागलं हेातं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बजेटमध्ये कर्जमाफीची घोषणा केली आणि त्यासाठी तरतूद केली, ही चांगली गोष्ट झाली आहे.
कर्जमाफी दोन लाख रुपयांपर्यंत करताना दोन लाखांच्या वर ज्यांचं कर्ज थकलेले आहे, असे शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहतील. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची केवळ ५० हजारांच्या प्रोत्साहनपर अनुदानावर बोळवण होईल. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं होतं. त्यांचं कर्ज २०२६ मध्ये थकीत होणार होते. त्यामुळे सप्टेंबर २०२५ ची जी डेडलाईन टाकण्यात आली आहे. त्यामुळे त्यातून अतिवृष्टीग्रस्त शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहतील, अशी भीती आम्हाला वाटत आहे, असेही डॉ. अजित नवलेंनी (Ajit Navale) स्पष्ट केले.
नवले म्हणाले, कर्जमाफीची घोषणा करताना देवेंद्र फडणवीस यांनी पात्र शेतकऱ्यांचीच कर्ज माफ होईल, असे सांगितले आहे. त्याचा सरळ अर्थ असा आहे की, जी समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्या नव्या अटी आणि शर्ती टाकतील. त्यातून दोन लाखांच्या आतमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांपैकीसुद्धा काही जण अर्टी व शर्तींमुळे वगळले जातील, अशी भीती वाटते. त्यामुळे अटी व शर्ती वगळून नियमित, अनियमित हा घोळ न घालता ३० जून २०२६ पर्यंत जे शेतकरी थकीत होतील, त्या सर्वांचं कर्ज माफ करण्याचा पुनर्विचार राज्य सरकारने करावा, अशी विनंती आम्ही करतो आहोत.
फडणवीस यांच्या घोषणेनुसार जे शेतकरी दोन लाख रुपयांपर्यत थकीत आहेत, त्यांचं कर्ज माफ होईल, असा विचार करण्यात आलेला आहे. त्यामुळे जे शेतकरी दोन लाखांपेक्षा जास्त रक्कमेचे आहेत, ते या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत, असेही नवलेंनी नमूद केले.
दोन लाखांपेक्षा जास्त ज्यांचे कर्ज आहे, त्यांना वन टाईम शेटलमेंट योजना द्यायची आणि दोन लाखांच्या वर त्यांचं जे कर्ज होईल ते त्यांनी फेडलं. तर दोन लाखांच्या आतील रक्कम राज्य सरकार भरेल, असा मार्ग काढण्यात आला, तरच दोन लाखांच्या वर कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यालासुद्धा या कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. त्यासाठी वन टाईम शेटलमेंट योजना आणून संबंधित बॅंकांना बोलून तसा निर्णय करावा लागेल. तूर्त तरी दोन लाखांच्या वर थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा विचार या कर्जमाफीत करण्यात आलेला नाही, असे या घोषणेच्या आधारे आपल्याला म्हणता येईल, असा दावाही नवले यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.