अजित पवारांची मोठी घोषणा; आमदारांसह त्यांच्या पीए, ड्रायव्हरलाही केले खूश

अजित पवार (Ajit Pawar) यांचा भाजपला (BjP) टोला लगावला.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : इकडच्या तिकडच्या योजना आणल्या... केंद्रातीलच योजना या अर्थसंकल्पात (Assembly Budget Session) होत्या असे विरोधी पक्ष बोलत होते... मला कळत नाही यांना 'येड पांघरूण पेडगावला जायचे होते' की त्यांचा 'अभ्यास कमी होता' म्हणून अर्थसंकल्पावर टिका करत होते, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगावली.

अर्थसंकल्पावरील चर्चेवर उत्तर देताना अजित पवार यांनी 'सत्य आम्हा मनी, नव्हे गबाळाचे धनी, देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयाची बरे, या संत तुकारामांच्या अभंगाने सुरुवात केली. राज्य अडचणीतून पुढे जात असताना राज्याला कर्जातून बाहेर काढताना महसुली तुट कशी कमी करता येईल, नागरीकांवर कराचा भार पडता कामा नये व राज्याचा गाडा सुरळीत चालेल, विकासाला खीळ बसणार नाही, असा प्रयत्न या अर्थसंकल्पात केल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar
फडणवीस हा मुद्दा उपस्थित करतील असे वाटले नव्हते; अजितदादांची विधानसभेत नाराजी

या वेळी पवार यांनी आमदारांसाठी (MLA) मोठी घोषणा केली. आमदार निधी चार कोटी हून पाच कोटी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर आमदारांच्या ड्रायव्हरला २० हजार रुपये पगार. पीएला ३० हजार रुपये पगार देण्यात येणार असल्याचेही पवार यांनी जाहीर केले. यावेळेला सभागृहातून आमदारांना गाडीसाठी निधी वाढवून द्या, अशी मागणी केली गेली त्यावर पवार म्हणाले, ते इलेक्ट्रिक कार येणार आहेत त्याची वाट पाहू.

Ajit Pawar
अमित शहांनी त्यांच्या भाषेत राणेंची समजूत काढली आणि सावंतांचे नाव फायनल झाले..

या वेळी पवार यांनी भाजपलाही (BJP) टोला लगावला, सरकार आणण्याचा प्रयत्न करताय ठिक आहे. मात्र, ठराविकांना जास्त पैसे दिले असे बोलून काय होणार आहे का? असेही ते म्हणाले. यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांचेही २१ पक्षांचे सरकार होते, याची आठवणही त्यांनी करुन दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com