Ajit Pawar Death: अजित पवार विमान दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट, रोहित पवारांच्या पाठपुराव्याला यश; सरकारचा 'VSR' कंपनीला पहिला दणका

Baramati Airplane Crash : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद आणि व्हिडिओ सादरीकरणासह काही गंभीर सवाल उपस्थित करतानाच त्यांनी काही संशयाच्या आधारे हा अजितदादांचा घातच झाला असल्याचाही दावा केला होता. तसेच विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनीही अजित पवारांच्या विमान अपघातप्रकऱणी सातत्यानं संशय व्यक्त करतानाच तो घातपात असल्याचं म्हटलं होतं.
Ajit Pawar Death News in Marathi
Ajit Pawar Death News in MarathiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बारामती दुर्घटनेप्रकरणी धक्कादायक प्रश्न उपस्थित केले होते. तसेच त्यांनी डीसीजीएचा प्राथमिक चौकशी अहवाल लवकरात लवकर मिळावा आणि संबंधित VSR विमान कंपनीवरही कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उचलून धरली आहे. अशातच आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद आणि व्हिडिओ सादरीकरणासह काही गंभीर सवाल उपस्थित करतानाच त्यांनी काही संशयाच्या आधारे हा अजित पवार (Ajit Pawar) यांचा घातच झाला असल्याचाही दावा केला होता. त्यानंतर त्यांनी थेट दिल्ली गाठत खासगी गुप्तहेरांमार्फत भेट घेत डीसीजीएच्या अहवाल लवकरात लवकर मिळण्यासाठी मोठी पावलं उचलल्याचंही समोर आलं होतं.

रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला मोठं यश येत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण बारामती दुर्घटना प्रकरणातील विमानाच्या हवाई प्रवास क्षमता आणि उड्डाण योग्यतेबाबतचाही तपास होणार आहे. तसेच विमान कंपनीच्या कागदपत्रांचीही पडताळणी केली जाणार असल्याची अपडेट समोर येत आहे. यामुळे रोहित पवारांच्या दबावानंतर आता सरकार अॅक्शन मोडवर आल्याचं दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी दिल्ली गाठत अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी दिल्लीत हवाई क्षेत्रात वैमानिक व अन्य पदांवर राहिलेल्या अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यात दुर्घटनेसंबंधीचा अहवाल येण्यास विलंब लागण्याची शक्यता काही अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. याच पार्श्वभूमीवर अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणाचा अहवाल तातडीनं मिळण्यासाठी रोहित पवार हे खासगी गुप्तहेरांची मदत घेत असल्याचं समोर आलं होतं.

Ajit Pawar Death News in Marathi
Sunil Tatkare: अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय समिकरणं बदलली! विलिनिकरणाचा प्रस्ताव आल्यावर...; तटकरेंनी पहिल्यांदाच मांडली स्पष्ट भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार याच्या विमान अपघातप्रकऱणी सातत्यानं संशय व्यक्त करतानाच तो घातपात असल्याचे आरोप केले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यात ब्लॅक बॉक्सचं सत्य समोर येईल,पण अजितदादांच्या विमानाचे पायलट ऐनवेळी का बदलण्यात आले. आधीचे पायलट कोणत्या ट्रॅफिकमध्ये अडकले होते. ते घरातून कधी निघाले होते, याचा सीसीटीव्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

अमोल मिटकरी यांनी पण हे दोन पायलट, साहिल मदन आणि यश, हे घरातून कधी निघाले? ते कोणत्या गाडीतून बाहेर पडले? कोणत्या रोडवरील ट्रॅफिकमध्ये अडकले? मृत्यूमुखी पडलेले सुमित कपूर आणि शांभवी पाठक हे घरातून कधी निघाले? या सगळ्याचे सीटीटीव्ही जाहीर करावेत, अशी मागणी अमोल मिटकरींनी केली आहे. सगळ्या पायलटांचा दिनक्रम आणि 28 जानेवारी रोजीचे सर्व सीटीटीव्ही फुटेज महाराष्ट्राला कळू द्यावेत, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे.

Ajit Pawar Death News in Marathi
Pune Congress Bhavan: महापौर मंजुषा नागपुरेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेस हायकोर्टात जाणार; पहिला दगड कोणी भिरकावला? याचाही फैसला तिथंच होणार

रोहित पवारांची पोस्ट

रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणाला आता वीस दिवस उलटून गेल्यानंतरही अद्यापही DGCA चा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला नसल्याचं पोस्ट करत म्हटलं आहे. तसेच सर्व नियमांचे उल्लंघन करत विमाने चालवणाऱ्या VSR कंपनीविरोधात देखील काहीही कारवाई अद्यापपर्यंत झालेली नसल्याची बाब अधोरेखित केली आहे.

परिणामी शंका अधिक बळावत चालल्या आहेत. त्यामुळे DGCA ने लवकरात लवकर प्राथमिक चौकशी अहवाल देण्याची मागणी रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केली आहे. तसेच त्यांनी VSR वर योग्य ती कारवाई करण्यात यावी असंही म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com