Ajit Pawar In Pune Metro : अजित पवारांनी केला 'रुबी हॉल ते वनाज' पुणे मेट्रो प्रवास!

Ajit Pawar Pune Metro Traveling : "आम्ही पूर्वी कारने प्रवास करत होतो. परंतु मेट्रोची सुविधा मिळाल्यामुळे कारचा वापर करत नाही.."
Ajit Pawar In Pune Metro :
Ajit Pawar In Pune Metro :Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : पुण्यातील चांदणी चौकातील पुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. या पुलामुळे चांदणी चौकातील वाहतूक कोंडींची समस्या बऱ्याच अंशी कमी होईल, असा दावा करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहिले होते. दरम्यान या कार्यक्रमाआधी अजित पवारांनी पुणे मेट्रोने प्रवास केला. (Latest Marathi News)

Ajit Pawar In Pune Metro :
NCP Split : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार अन् वळसे पाटील पहिल्यांदाच एकत्र येणार..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुबी हॉल रूग्णालय ते वनाजपर्यंत मेट्रोने प्रवास केला आहे. यावेळी त्यांनी मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांशी संवाद साधला. सार्वजनिक वाहतूक अधिक बळकट करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. "फिल्डवर गेल्यावर खऱ्या समस्या कळतात. आता आयटीमधील तरुणांशी चर्चा झाली. ते म्हणाले की, 'आम्ही पूर्वी कारने प्रवास करत होतो. परंतु मेट्रोची सुविधा मिळाल्यामुळे कारचा वापर करत नाही,' असे त्या तरुणांनी मला सांगितले," असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar In Pune Metro :
Nawab Malik Bail : 'अजित पवार भाजपसोबत गेल्यानेच नवाब मलिकांना जामीन ?' राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने म्हंटलं..

"कोणत्याही शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली झाल्याशिवाय वाहतूक कोंडीची प्रश्न सुटणार नाही, यामुळे पुणे शहरात मेट्रोसह इतर पर्याय दिले जाणार आहेत. पुणे मेट्रो सकाळी सहा वाजल्यापासून सुरु करा, अशी मागणी अनेकांनी केली आहे. त्यांच्या या मागणीवर आता विचार केला जाईल," असे ही अजित पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.