Sudhir Mungantiwar on Sharad Pawar : भटकती आत्मा शांत करण्याचे काम अमित शाहांना माहिती आहे; मुनगंटीवारांचा पवारांवर पलटवार

Narendra Modi Vs Sharad Pawar : नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाला न शोभणारी भाषा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वापरली होती. मलाही त्यांनी भटकती आत्मा असं म्हटलं होतं.
Sharad Pawar-Narendra Modi-Amit Shah-Sudhir Mungantiwar
Sharad Pawar-Narendra Modi-Amit Shah-Sudhir MungantiwarSarkarnama

Mumbai, 11 June : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पुण्यातील सभेत बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भटकती आत्मा असं म्हटलं होतं. त्याचं कवित्व अजूनही सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरमधील वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शरद पवारांनी मोदींना उद्देशून ‘हा भटकती आत्मा तुम्हाला सोडणार नाही,’ असा इशारा दिला. त्यावर भटकती आत्मा शांत करण्याचे काम अमित शाह यांना माहिती आहे, असं सूचक विधान केले आहे.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पंतप्रधानपदाला न शोभणारी भाषा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वापरली होती. मलाही त्यांनी भटकती आत्मा असं म्हटलं होतं. आत्मा जिवंत राहतो, हे जर मोदी मानत असतील तर हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही, अशी टीका नगरमधील मेळाव्यात बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सूचक विधान केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना भटकती आत्मा शांत करण्याचं काम माहिती आहे. भटकती आत्म्याचा त्रास काही दिवस होतोच. त्यानंतर त्याला शांत केलं जातं, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात 2 कोटी स्मार्ट वीज मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यावरही मुनगंटीवार यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, स्मार्ट वीज मीटर लावताना ग्राहकाला त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. महाविकास आघाडीकडून याबाबत गैरसमज पसरविण्यात येत आहे, ते याबाबत गोबेल्सलाही मागे टाकतील, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

Sharad Pawar-Narendra Modi-Amit Shah-Sudhir Mungantiwar
NCP Leader Big Statement : फाटाफूट झालेल्या नेत्यांनी एकत्र यावं; जनतेचा तसा कौल; राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान

स्मार्ट मीटरच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर ते समजून घेतली जातील. स्मार्ट मीटरच्या आराखड्याचे पुढील कॅबिनेट बैठकीत सादरीकरण होणार आहे. विजेचे हे स्मार्ट मीटर लावताना ग्राहकाला त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. आमच्या सरकारमध्ये ग्राहकांना त्रास होईल, असं काहीही होणार नाही, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar-Narendra Modi-Amit Shah-Sudhir Mungantiwar
Ajit Pawar : लोकसभेतील पिछाडीचा धसका; अजितदादांच्या आमदाराचा जरांगेंच्या मागणीला पाठिंबा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com