अमोल मिटकरींनी मला ढकललं; महेश शिंदेंनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम!

राष्ट्रवादीचे NCP MLA आमदार अमोल मिटकरी Amol Mitkari आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे MLA Mahesh Shinde आमनेसामने आले.
Mahesh Shinde, Amol Mitkari
Mahesh Shinde, Amol Mitkarisarkarnama
Published on
Updated on

मुंबई : गेल्या अडीच वर्षात विरोधकांनी केलेला गैरकारभार केला तो आम्ही उघड केल्याने त्यांना सहन न झाल्याने आमच्या आंदोलनात येऊन विरोधकांनी धक्काबुक्की केली. गेल्या अडीच वर्षात त्यांनी अर्थ खाते धुवून खाल्ले. महाराष्ट्राचे अर्थ खाते धुवून खाऊन बारामतीला नेले. मिटकरींना माझा प्रश्न आहे. अर्थखाते लुटून बारामतीला जे पैसे गेले ते बाहेर येईल याची भिती वाटल्याने विरोधकांनी आमचे आंदोलन दाबले, असा आरोप कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी केला आहे.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आमनेसामने आले. घडल्या प्रकारानंतर आमदार महेश शिंदेंनी मिटकरींवर आरोप केले. महेश शिंदे म्हणाले, विधीमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधक आमच्या विरोधात घोषणा देत चिथावत होते. सातत्याने घोषणा देत होते.

Mahesh Shinde, Amol Mitkari
विधानभवन कँन्टीनमधील सवलत बंद करण्याची लक्ष्मण जगताप यांची मागणी

आम्ही आमच्या पध्दतीने सगळ्या आमदारांनी एकत्र येऊन घोषणा देऊन आंदोलन करत होतो. पण, पाठीमागून काही विधीमंडळ सदस्य पुढे आले व आमच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गाजरे आणली होती, धक्काबुक्की केली. त्यांची ही धक्काबुक्की म्हणजे गैरवर्तन असून ती अशोभनिय आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने लोकशाही पध्दतीने आंदोलन करत होतो. मागील अडीच वर्षात विरोधकांनी जो गैरकारभार केलेला आहे. तो त्यांना सहन झाला नाही. त्यामुळे हे लोकशाहीत चालेलेल आमचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

Mahesh Shinde, Amol Mitkari
NCP : राष्ट्रवादीला खोक्याचीच भाषा कळते; भांडवलदार, ठेकेदारांशीच त्यांचे संबंध... महेश शिंदे

अमोल मिटकरींवर आरोप करताना महेश शिंदक म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणातील काळा डाग म्हणजे मिटकरी आहेत. त्यांचे वागण सभागृहाने व महाराष्ट्राने पाहिले आहे. अमोल मिटकरींनी आम्हाला ढकलले. ते लोकशाहीवादी विचारांचा नेता नाहीत. ते जहाल विचारांचे असून ते चुकीचे विचारांचे आहेत. अशा विचारांच्या माणसांपासून लोकशाहीला धोका होतो. अशा लोकांवर त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.

Mahesh Shinde, Amol Mitkari
Maharashtra Assembly : मिटकरी-शिंदेंमध्ये धक्काबुक्की ; रोहित पवारांची मध्यस्थी, नेमकं काय झालं ? जाणून घ्या !

महेश शिंदे पुढे म्हणाले, एखादे प्रकरण दुसऱ्या दिशेला कसे न्यायचे व आपली चुक उघडकीस येईल या भितीने दुसऱ्या दिशेला नेण्याचा विरोधकांचा हा केविलवाणा प्रयत्न होता. पत्रकारांना कोणतीही धक्काबुक्की झालेली नाही. आमच्या आंदोलनातील घोषणाबाजीने सत्य बाहेर येतंय हे लक्षात आल्याने त्यांनी हे कृत्य केले असावे. कारण त्यांना सत्य कटु वाटले असावे.या प्रकरणी आमचे पक्ष प्रतोद आम्ही सर्वांनी एकत्रितपणे विचार करून विधानसभा अध्यक्षांकडे कारवाईची मागणी करणार आहोत.

Mahesh Shinde, Amol Mitkari
Mahesh Shinde : आमदार महेश शिंदेंना CM शिंदे, DCM फडणवीसांकडून वाढदिवसाची भेट

विधानभवनाबाहेर झालेला प्रकार शंभर टक्के निषेधार्य आहे. सगळ्यांनी आचारसंहिता पाळणे आवश्यक आहे. आमच्या आंदोलनाच्या ठिकाणी त्यांनी येणे चुकीचे आहे. त्यांचे सहा दिवस आंदोलन सुरू आहे. पण आमच्यातील कोणीही तेथे गेले नाही. पण, आंदोलनाच्या ठिकाणी त्यांचे लोक आले, त्यांनी संकेत पाळायला हवे होते. आमची विचारधारा आम्ही जपली आहे. आमच्यावर आरोप करता मग, आम्हालाही उत्तर द्यावे लागणार आहे. गेल्या अडीच वर्षात त्यांनी अर्थ खाते तुम्ही धुवून खाल्ले.

Mahesh Shinde, Amol Mitkari
पावसाळी अधिवेशन 2022 : विधानसभेत आज काय घडले?

हे महाराष्ट्राचे अर्थखाते धुवून खाऊन बारामतीला नेलं. मिटकरींना माझा प्रश्न आहे. बारामतीला जे पैसे गेले ते बघा अर्थखाते लुटले ते बाहेर येईल याची भिती वाटते म्हणून तुम्ही आमची आंदोलने दाबवत असल तर गद्दारी आम्ही नव्हे तुम्ही महाराष्ट्राशी गद्दारी केली आहे. सचिन वाझेच्या रूपाने महाराष्ट्राशी गद्दारी तुम्ही केली आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी तुम्ही केलींय आम्ही केलेली नाही. आम्ही सर्वांनी प्रामाणिक राहूनच निर्णय केलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास सक्षम असून बाळासाहेबांचा विचार पुढे नेणार आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com