अनिल देशमुख बाहेर येणार? ईडीची महत्वाची अपडेट आली समोर!

Anil Deshmukh : सीबीआय विशेष न्यायालयात जामीनासाठी देशमुखांनी केला अर्ज
Anil Deshmukh
Anil Deshmukh Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) कोठडीतला मुक्काम संपवून बाहेर येणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ईडीच्या गुन्ह्यात देशमुखांना जामीन मंजूर झाल्यानंतर, आता सीबीआय विशेष न्यायालयात जामीनासाठी त्यांनी याचना केली आहे. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी देशमुखांना हायकोर्टाने दिलासा दिला होता. आर्थिक गैरव्यवहार आणि वसूलीचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. मात्र जामीनानंतरही देशमुखांची अद्याप सुटका होऊ शकली नाही.

Anil Deshmukh
Dasara Melava : कुणाच्या मेळाव्याला जास्त गर्दी? पाहा पोलिसांची आकडेवारी!

ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये त्यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आता त्यांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयात जामीनासाठी त्यांनी अर्ज केला. मात्र यावर सुनावणी कधी घेण्यात येणार, हे अजूनही स्पष्ट नाही. मात्र लवकरच यावर सुनावणी होऊ शकते. सीबीआयच्या विशेष न्यायालयात अनिल देशमुखांना दिलासा मिळेल का ? हे पाहणं महत्त्वाचं ठणार आहे.

दरम्यान ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात देशमुखांना मंजूर झालेल्या जामीनाला ईडीकडून न्यायालयात आव्हान मिळू शकते, अशी माहिती आहे. 13 अॉक्टोबर रोजी ईडी देशमुखांना मिळालेलं जामीन रद्द करण्यासाठीन्यायालयात अर्ज दाखल करणार आहे.

Anil Deshmukh
दसरा मेळावा : गर्दी जमली, पण भाषणं जमले नाही..

यामुळे एकीकडे देशमुखांची सुटकेची शक्यता निर्माण होत असताना, त्यांचा मंजूर झालेला जामीन रद्द करण्यासाठीसुद्धा प्रयत्न होताना दिसत आहे. आता देशमुखांची सुटका होते की, त्यांचा कोठडीतला मुक्काम अजून वाढला जातो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com