अनिल परब ईडी चौकशीला जाणार नाहीत, कारण ...

Anil Parab |ED|BJP| किरीट सोमय्या दापोलीतील साई रिसॉर्टवरून अनिल परब यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.
Anil Parab
Anil Parab
Published on
Updated on

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने (ED) चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. मात्र, ते चौकशीला हजर राहणार नसल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली होती. मंत्री अनिल परब (Anil Parab) आज शिर्डी दौऱ्यावर असून त्यांनी आज साईबाबांच्या दरबारात हजेरी लावली. साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला मंत्री परब उपस्थित राहणार आहेत. अनिल परब यांचा दौरा हा पूर्वनियोजित असल्याने ते आज चौकशीला हजर राहणार नाही.

दापोलीतील कथित बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणात चौकशी करण्यासाठी ईडीने अनिल परब यांना आज सकाळी 10 वाजता चौकशीसाठी बोलवलं होतं. काही दिवसांपूर्वी अनिल परब आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या संबंधित ठिकाणांवरही ईडीने छापेमारी केली होती. त्यामुळे आज अनिल परब चौकशीला हजर राहणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. पण, पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे ते ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहू शकणार नाहीत, अशी माहिती त्यांच्या वकीलांनी अधिकाऱ्यांना दिली आहे.

Anil Parab
लाड अन् भाईंचा संघर्ष; दोघेही एकमेकांना नाकीनऊ आणणार

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून केंद्रीय तपाय यंत्रणांचा दुरुपयोग सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेते करत आहेत. अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक नेते समजले जातात. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून अनिल परब ईडीच्या रडारवर आले आहेत. यापूर्वी ईडीने अनिल परब यांच्या खासगी आणि शासकीय निवासस्थानावर छापेमारी केली होती. त्यासोबतच अंधेरीतील त्यांच्या शिवसेना पदाधिकाऱ्याच्या घराचाही झडती घेतली होती.

भाजप नेते किरीट सोमय्या दापोलीतील साई रिसॉर्टवरून अनिल परब यांच्यावर अनेक आरोप करत आहेत. साई रिसॉर्ट गैरव्यवहार प्रकरणी ईडीने केलेल्या छापेमारीत सात ठिकाणांहून अनेक कागदपत्रं ईडीने ताब्यात घेतली होती. या प्रकरणात आता आज ईडीने अनिल परब यांना मुंबईतील कार्यालयात चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. साई रिसॉर्टसाठी केलेला खर्च अनधिकृत असल्याचा संशय ईडीला आहे. या प्रकरणात ईडीने अनेकांचे जबाबही नोंदवले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com