Shiv Sena Election Coordinator's : रेडकर, जोशी आणि भोर यांची शिवसेनेच्या समन्वयकपदी नियुक्ती

Loksabha Election Campaign Strategies :अरुण रेडकर, विलास जोशी आणि अनिल भोर या तिघांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती एक वर्षाकरिता करण्यात आले असून, तिघे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात.
Shiv Sena Election Coordinator's : रेडकर, जोशी आणि भोर यांची शिवसेनेच्या समन्वयकपदी नियुक्ती
Published on
Updated on

Thane Political News : शिवसेना (Shivsena) पक्षाच्या महाराष्ट्र राज्य समन्वयकपदी (निवडणूक विभाग) ठाणेकर असलेले अरुण रेडकर, विलास जोशी आणि अनिल भोर या तिघांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती एक वर्षाकरिता करण्यात आले असून, तिघे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात.

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाल्यानंतर आता पक्षाच्या महाराष्ट्र राज्य समन्वयकपदी (निवडणूक विभाग) तिघांची नियुक्ती रविवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यातच हे वर्ष निवडणुकीचे असल्याने ही नियुक्ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आदेशाने झाली आहे.

याशिवाय बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तसेच शिवसेना पक्षवाढीसाठी त्या तिघांना सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल, असा विश्वास पक्षांनी त्यांच्यावर टाकलेला आहे. पक्षाचे सचिव संजय मोरे यांची स्वाक्षरी असलेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

कोण आहेत ही मंडळी...

भोर हे उपविभागप्रमुख असून ते ठाणे महानगरपालिकेचे माजी परिवहन समिती सभापती आहेत. तसेच जोशी हे विद्यमान ठाणे महानगरपालिकेचे परिवहन समिती सभापती आहेत, तर रेडकर हे संभाजीनगर येथे झालेल्या पहिल्या निवडणुकीच्या वेळी संपर्क प्रमुख होते. तसेच ते निवडणुकीसंदर्भात काम करत असून, त्यांनी बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्यासोबत काम केले आहे. सध्या ते मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत पक्षाचे काम करतात. हे तिघेही एकनाथ शिंदे यांचे कट्टर सर्थक आणि विश्वासू आणि निकटवर्ती सहकारी मानले जातात.

Edited By : Rashmi Mane

R

Shiv Sena Election Coordinator's : रेडकर, जोशी आणि भोर यांची शिवसेनेच्या समन्वयकपदी नियुक्ती
Eknath Shinde : 'कल्याण'साठी ठाण्याच्या जागेवर सोडावं लागणार पाणी? ; शिंदे कसा सोडवणार तिढा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com