Devendra Fadnavis: फडणवीसांचा हा फक्त ट्रेलर, मोठा चित्रपट यायचायं !

युती आम्ही तोडली का, खोटं कोण बोललं, पाठीत खंजीर कोणी खुपसला, हे कळेल.
Devendra Fadnavis News, Political News in Marathi, Ashish Shelar News
Devendra Fadnavis News, Political News in Marathi, Ashish Shelar NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यात दहा दिवस चाललेलं राजकीय बंड, त्यानंतर आलेले ट्विस्ट या सगळ्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) शपथ घेतली. त्यानंतर बैठक घेत कामाला सुरुवातही केली. मात्र असं असलं तरी कालपासून चर्चा रंगतेय ती फडणवीसांच्या नाराजीची आणि भाजपच्या अंतर्गत वादांची. यावर भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Eknath Shinde-Devendra Fadnavis News)

आशिष शेलार म्हणाले, "जे झालं ते राज्यासाठी योग्य आहे. त्यानुसार निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला आहे. त्यांचं मन आभाळ इतकं मोठं होत, त्यांनी निर्णय मान्य केला. देवेंद्र यांनी २०१४ मध्येही पद मागीतलं नव्हतं. २०१९ मध्ये त्यांनी मेहनत केली. राज्यासाठी योग्य तो निर्णय घेतला. हा फक्त ट्रेलर आहे अजून देवेंद्र फडणवीस यांचा मोठा चित्रपट यायचा आहे,"

ड्रायव्हिंग सीटवर फडणवीस असणार

"हा महाराष्ट्र पॅटर्न नाही, हा चित्रपट आहे, २०२४ लोकसभा आणि विधानसभेत निवडणुकीत तो दिसेल. युती आम्ही तोडली का, खोटं कोण बोललं, पाठीत खंजीर खुपसला, हे कळेल. महाविकास आघाडी मुख्यमंत्र्यांना तरी कुठे अनुभव होता. राष्ट्रवादीमध्ये ज्यांना अनुभव होता ते उपमुख्यमंत्री होते. एकनाथ शिंदेंना अनुभव आहे, त्यांच्या बरोबर ड्रायव्हिंग सीटवर फडणवीस असणार आहेत," असे शेलार म्हणाले.

Devendra Fadnavis News, Political News in Marathi, Ashish Shelar News
Assembly session : उद्यापासून सुरु होणारं विधिमंडळ अधिवेशन पुढे ढकललं

उद्धव ठाकरे विकासाच्या कामात स्पीड ब्रेकर

"उद्धव ठाकरे विकासाच्या कामात स्पीड ब्रेकर होते, आता विकासाची काम गतीमानपणे होतील. शिंदे सरकार योग्य पद्धतीने काम करणार, जनतेचा सुप्रशासन देणार," असे शेलार म्हणाले. "बाळासाहेबांचा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला आहे, ते त्यांना विरोध करीत आहेत. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेना बरोबर आहोत," असे शेलार म्हणाले.

फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदाबाबत ते नाराज आहेत, अशी चर्चा आहे. यावर शेलार म्हणाले, "कोणत्या राज्यातील नेत्यांसाठी पक्षश्रेष्ठी यांनी सार्वजनिकरित्या आवाहन केलं ? कोणासाठी पुढे येऊन सत्तेत बसावे म्हणून विनंती केली, मोदी यांच्या टि्वटनंतर हे स्पष्ट आहे. अस काही नाही,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com