Kapil Patil News : विधानसभा निवडणुकीसाठी अवघ्या दोन ते तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे छोटे पक्ष नवीन राजकीय समीकरणे जुळवत विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. महाविकास आघाडीसोबत जवळीक असणार समाजवादी गणराज्य पक्षाचे प्रमुख माजी आमदार कपिल पाटील यांनी आज (शनिवारी) मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधान आले आहे.
शिक्षक आणि पदवीधर निवडणुकींतर कपिल पाटील महाविकास आघाडीवर नाराज होते. विशेष करून उद्धव ठाकरे यांच्यावर कपिल पाटील यांची नाराजी असल्याचे बोलले जात होते. त्यात आज कपिल पाटील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेत नवीन राजकीय समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
मनसे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मनसेने महायुती किंवा महायुतीमध्ये न जाता स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. विधानसभा निवडणूक लढण्यासाठी कपिल पाटील इच्छुक आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर ते आज राज ठाकरेंच्या यांच्या भेटीला गेले.
कपिल पाटील यांची भेट राजकीय असल्याच्या चर्चा सुरू असताना मात्र ही भेट राजकीय नसल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले. राज्यामध्ये समाजासमाजामध्ये वितुष्ट निर्माण होत आहे. त्यामुळे सर्वांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. मी फुले, शाहु, आंबेडकरांचा वारसा मानतो. तो कायम राहिला पाहिजे. यासाठी सर्व राजकीय नेत्यांची भेट घेणार आहे. सामाजिक प्रश्नावर काम करत आलो आहे. राजकारण हा माझ्यासाठी दुय्यम मुद्दा आहे, असे कपिल पाटील म्हणाले.
मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल पाटील तीन टर्म विधान परिषदेत आमदार होते. यंदा त्यांनी विधान परिषदेतून रिटायर्ड होत असल्याची घोषणा केली. त्यांच्याऐवजी या मतदारसंघातून समाजवादी गणराज्य पक्षाचे सुभाष मोरे रिंगणात उतरवले होते. मुंबई शिक्षक मतदार संघातून ठाकरे सेनेचा उमेदवार विजयी झाला होता. विधान परिषदेमधून रिटायर्ड होण्याची घोशणा कपिल पाटील यांनी केल्यानंतर ते विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कपिल पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मदत करणारे छोटे राजकीय पक्ष महाविकास आघाडीपासून लांब जात असल्याच्या चर्चा आहेत. विधानसभेला जागा वाटपात जागा मिळाला नाही तर आणखी काही पक्ष, संघटना महाविकास आघाडीची साथ सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.