अँटिलिया प्रकरण अन् मनसुख हिरेन हत्येचे गूढ अखेर उलगडणार

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सोडण्याचे गूढ अखेर उलगडणार आहे.
Antilia Case
Antilia Case Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया (Antilia) निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सोडण्याचे गूढ अखेर उलगडणार आहे. या प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने तपास (ATS) केला होता. एटीएसने आता या प्रकरणाचा 1 हजार पानांचा तपास अहवाल चांदीवाल समितीसमोर (Chandiwal Committee) सादर केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनीच ही मागणी केली होती. यातून सत्य समोर येईल, असा दावा देशमुखांनी केला होता.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांनी देशमुखांवर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चांदीवाल समिती नेमली आहे. एटीएसच्या तपासातून 'परमसत्य' बाहेर येईल, असे देशमुखांनी समितीसमोर म्हटले होते. मनसुख हिरेन हत्या प्रकरणातही एटीएसने तपास केला होता. आता हा 1 हजार पानांचा अहवाल एटीएसने चांदीवाल समितीसमोर सादर केला आहे. एटीएसने अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान परमबीरसिंह यांच्याविरोधात पुरावे गोळा केले होते. हे अहवाल रेकॉर्डवर घेण्याची विनंती देशमुख यांनी आयोगाला केली होती, त्यानंतर आज एटीएसने 1 हजार पानांचा अहवाल आणि संबंधित कागदपत्रे आयोगाकडे सादर केली आहेत. यामुळे अँटिलिया प्रकरणासह मनसुख हिरेन हत्येचे गूढ उलगडण्याची शक्यता आहे.

Antilia Case
अन्यथा परमबीरसिंहांवर कारवाई करावी लागेल! चांदीवाल समितीची तंबी

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर स्फोटके असलेली मोटार सापडली होती. याप्रकरणी वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांची राज्य सरकारने बदली केली होती. या बदलीनंतर परमबीरसिंह यांनी थेट गृहमंत्र्यांकडून पैसे वसुलीसाठी दबाव असल्याचा आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली होती. या सर्व आरोपांची चौकशी चांदीवाल समिती करीत आहे.

Antilia Case
आता जिरली का? राणेंच्या 'गाडलाच'ला सतीश सावंतांचे प्रत्युत्तर

बदल्यांसाठी देशमुखांचे परबांकडे बोट

दरम्यान, देशमुख यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) अटक केली असून, त्यांचा मुक्काम सध्या आर्थर रोड तुरूंगात आहे. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या अनधिकृत याद्या पाठवायचे, अशी कबुली राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी ईडीसमोर नुकतीच दिली होती. ईडीने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रातील जबाबात मात्र, देशमुखांनी यासाठी शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याकडे बोट दाखवले होते. परब यांनी दिलेली यादीच मी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिल्याचे देशमुख यांनी म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com