Bandra East Assembly Election 2024 : ठाकरे सेनेचा पहिला उमेदवार जाहीर; नातेवाईकालाच तिकीट दिलं...

Shivsena UBT News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. शिवसेना नेते आणि विधान परिषद सदस्य अनिल परब यांनी शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात याबाबतची घोषणा केली.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 17 Oct : वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (Shivsena UBT) (उद्धव ठाकरे) पक्षाकडून वरुण सरदेसाईंचे नाव निश्चित करण्यात आलं आहे.

याबाबतची घोषणा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि विधान परिषद सदस्य अनिल परब (Anil Parab) यांनी पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात केली आहे.

वरुण सरदेसाई (Varun Sardesai) हे ठाकरे घराण्याचे विश्वासू मानले जातात. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ असणाऱ्या वरुण सरदेसाईंनी लोकसभा आणि मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत उत्तम कामगिरी केल्यामुळे त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याची माहिती आहे.

त्यामुळे ठाकरेंनी एका जागेवरील उमेदवारी निश्चित केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची (Shivsena) विधानसभा उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray
Mumbai BJP News : भाजपचा मुंबईतील विद्यमान आमदारांना मोठा धक्का! राम कदमांसह 'या' 5 जणांचा पत्ता कट होणार?

कोण आहेत वरून सरदेसाई?

वरुण सरदेसाई हे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या बहिणीचे पुत्र आहेत. म्हणजेच ते आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आहेत. त्यांच्याकडे शिवसेना युवासेनेसह, शिवसेनेच्या आयटी सेलची मोठी जबाबदारी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com